स्थानिक स्वराज्य संस्थेतील रद्द केलेले ओबीसी समाजाचे आरक्षण अबाधित ठेवण्या यावे…मागणी
किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातूर…तालुका प्रतिनिधी… मा सर्वोच्च न्यायालया तर्फे दिनांक २८ मे २०२१ रोजी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीबाबत ओबीसींचे आरक्षण रद्द ठरविल्याचा आदेश दिला आहे.त्या आदेशानुसार महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचे २७% राजकिय आरक्षण हे रद्द झालेले आहे.त्यामुळे ग्रामपंचायत,पंचायत समिती,जिल्हापरिषद, नगरपरिषद व महानगरपालिका यामधे ओबीसी समाजाला जे प्रतिनिधित्व मिळत होते ते राज्य सरकारने कोर्टाला इम्पिरीकल डाटा आजपावेतो सादर केला नाही. म्हणून सदर आरक्षण रद्द केले आहे. हा ओबीसी समाजावर घोर अन्याय झालेला आहे.त्याचा निषेध नोंदविण्यासाठी तेली समाजाची राज्यस्तरीय संघटना महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने आज २ जुलै २०२१ रोजी महाराष्ट्रभर लक्ष्मी उपोषण व निवेदनाद्वारे खालील मागण्यांकडे आपले लक्ष वेधून निवेदन देण्यात आले. या निवेदना मध्ये १)मा.सुप्रिम कोर्टाला ओबीसींच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणा करिता ईम्पिरिकल डाटा अपेक्षित आहे. मराठा आरक्षणाच्या वेळी जसा संकलित केला गेला होता त्याच धर्तीवर डाटा संकलीत करून सदर डाटा महाराष्ट्र शासनाने पुढील तीन महिन्यात सुप्रीम कोर्टात सादर करावा तसे शपथपत्र दाखल करावे. सदर डाटाच्या आधारे सुप्रिम कोर्टात अपिल करून सुप्रिम कोर्टाने दिलेला स्थगिती आदेश रद्द करवून राज्यात २७% ओबीसींचे रद्द केलेले राजकीय आरक्षण पुन्हा लागू करावे..
२) महाराष्ट्र शासनाच्या राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीसाठी दि.२३ जून२०२१ रोजी अधिसूचना काढली आहे ती रद्द करण्यासाठी महाराष्ट्राचे प्रधान सचिव मा श्री सितारामजी कुंटेसाहेब यांनी दिलेल्या २४ जूनच्या पत्राप्रमाणेच कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पोटनिवडणूक रद्द करण्यासाठी मा.सुप्रिम कोर्टात अपील करुन होऊ घातलेल्या पोटनिवडणूका रद्द कराव्यात..३)राज्य व केंद्रशासनाने मंडल आयोगाच्या सर्व शिफारशी लागू कराव्या..! ४) केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाने ओबीसींची जातीनिहाय जनगणना करावी व ओबीसींच्या संख्येच्या प्रमाणात/ टक्केवारीनुसार त्यांना प्रत्येक क्षेत्रात आरक्षण देण्यात यावे..५) राज्य व केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणनेनुसार ओबीसी आरक्षणाचा कायदा करावा. या सह विविध मागण्यांचे निवेदन पातूर तहसीलदार यांना देण्यात आले आहे.यावेळी डॉ. मदन नालिंदे, ड्रा. दिगंबर खुरसडे, वसंत वानखडे ,सतीश सरोदे ,गजानन रनमोले, राहुल वाघमारे, ड्रा. नंदकिशोर राऊत ,संदीप तायडे ,योगेश मेहरे,अमित दळवे, सागर हरणे ,अतुल भांगे, किरण शेवलकार, विनायकराव वानखडे, यांच्यासह महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे पदाधिकारी उपस्थित होते..










