अॅट्रॉसिटी कायदा हा रक्षणासाठी आहे. मात्र त्याचा वापर हा ब्लॅकमेलिंगसाठी केला जात आहे. अॅट्रॉसिटीचा धाक दाखवणाऱ्यांना धडा शिकवण्याची गरज आहे. असे वादग्रस्त विधान शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे.
सविस्तर प्रकरण असे :
बुलडाणा जिल्ह्यामध्ये खामगाव तालुक्यात वाघ कुटुंबावर हल्ला करण्यात आला होता.अॅट्रॉसिटी कायद्याचा धाक दाखवून रमेश हिवराळे नामक इसमाने हा हल्ला केल्याचा आरोप आहे. यावेळी पीडित कुटुंबाची आमदार संजय गायकवाड यांनी भेट घेतली. यावेळीच संजय गायकवाड यांनी अॅट्रॉसिटी कायद्याबाबत हे विधान केले. अॅट्रॉसिटी कायदा हा रक्षणासाठी केलेला कायदा आहे. मात्र या कायद्याचा वापर ब्लॅकमेलिंग करण्यासाठी केला जात आहे. असे ते म्हणाले. अन्याय झाल्याच प्रतिकार करा, असा सल्लाही गायकवाड यांनी पीडितांना दिला. कुणी अन्याय करत असेल तर आसपासच्या तरुणांचे पथक बनवा. वेळ आल्यास तुटून पडा.
अॅट्रॉसिटीचा धाक कुणी दाखवत असेल तर तुम्हीही त्याच्याविरोधात दरोड्याची तक्रार द्या. यापुढे येथे असा हल्ला झाला तर मी स्वत: १० हजारांची फौज घेऊन येईन आणि सगळ्यांना एका फटक्यात सरळ करेन, असा इशाराही संजय गायकवाड यांनी दिला.या वक्तव्यावर समाज माध्यमांवर आता सडाडुन टीका केली जात आहे.


