गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा दि :- तालुक्यातील चारही भागाच्या दयनीय अवस्था झालेल्या रस्त्यांन बाबत विशाल नांदोकार या युवकाने दिनांक 26 जून पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली असता आज उपोषणाच्या पाचव्या दिवशी जिल्ह्याचे पालकमंत्री ना . बच्चू कडू यांनी उपोषणस्थळी भेट देऊन सर्वांच्या समोर रस्त्यांचे विकास कामे विनाविलंब सुरू होतील असे ठोस आश्वासन दिल्यानंतर उपोषण करते विशाल नांदोकार यांनी आपले उपोषण मागे घेतले तसेच या वेळी उपोषणकर्त्यांच्या हस्ते विकास कामांचा शुभारंभ सुद्धा करण्यात आला.तालुक्यातील चारही भागाच्या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असल्याने या भयावह व खड्डेमय रस्त्यांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला तर अनेकजन अपघातामध्ये जखमी झाले या रस्त्यामुळे नागरिकांना होत असलेल्या मोठ्या त्रासाबद्दल विशाल नांदोकार या युवकाने थांबलेले विकास कामे सुरु करण्याबाबत आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला होता या तालुक्यातील रस्त्यांची कामे विनाविलंब सुरु करण्या बाबत तालुक्यातील नागरिकांनी व विविध सामाजिक संघटनानि मोठ्या प्रमाणात पाठिंबा देऊन या उपोषणाची व्याप्ती वाढवली होती 29 जून ला तालुका बंद यशस्वी झाल्यानंतर आज 30 जून ला शहरासह तालुक्यातील नागरिकांनी रस्त्यांच्या मागण्यांच्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभागीय कार्यालय तेल्हाऱ्याला घेराव घातला तसेच 1 जुलैला संपूर्ण तालुक्यामध्ये रास्ता रोको करण्याचे ठरविण्यात आले होते तसेच 2 जुलैला या भागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या घरासमोर तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला येथे ठिय्या आंदोलन देऊन सात दिवस सतत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता याचे सर्व स्तरातून दखल घेतल्या जात असल्यामुळे या यादरम्यान आज जिल्ह्याचे पालकमंत्री ना .बच्चू कडू यांनी उपोषणस्थळी भेट देऊन ज्यांनी गेल्या पाच दिवसापासून आमरण उपोषण सुरू केले असे विशाल नांदोकार यांनी सदर आंदोलन आमरण उपोषणाचा मार्ग का स्वीकारला याची इत्थंभूत माहिती दिली या नंतर पालकमंत्री यांनी उपोषणकर्त्यांना व उपस्थित असलेल्या समस्त नागरिकांच्या समोर विकास कामांबाबत यापुढे कुठल्याही प्रकारचा अडथळा सहन केल्या जाणार नसल्याची अधिकाऱ्यांना तंबी देऊन विकास कामे अविरत सुरू राहण्याबाबत ठोस आश्वासन देऊन दर दिवशी व महिन्याला त्याचा अहवाल मागितला जाईल व यापुढे विकास कामे थांबणार नाही अशाप्रकारचे सर्वांसमक्ष ठोस आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्ते विशाल महादेवराव नांदोकार या युवकाने आपले आमरण उपोषण पाचव्या दिवशी सोडले तसेच यावेळी पालकमंत्री बच्चू कडू यांच्या उपस्थितीत उपोषण करते नांदोकार यांच्या हस्ते थांबलेल्या रस्त्यांचा शुभारंभ करण्यात आला यावेळी तेल्हारा शहरासह तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच कार्यकारी अभियंता पी आर सरनाइक सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता संजय बोचे शाखा अभियंता एस बी खोने तसेच ज्या कंत्राटदाराने हे काम घेतले ते सदर कंत्राटदार इंजिनीयर आधी त्यांची सर्व यंत्रणा उपस्थित होती
पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर
पालकमंत्री नामदार बच्चू कडू यांनी उपोषण करते विशाल नांदोकार या युवकाची भेट घेण्यापूर्वी स्थानिक विश्रामगृह येथे संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तालुक्यातील चारही भागातील रस्ते का थांबविण्यात आले याबाबत सविस्तर माहिती घेतली असता धिकारी व कंत्राटदार सविस्तर उत्तर देवू शकले नाही सुरुवातीच्या कंत्राटदाराने किती कोटीचे काम केले व त्याला किती कोटी दिले याचे सुद्धा अधिकारी सविस्तर उत्तर देऊ शकले नाही यावरून पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकारी यांना चांगलेच धारेवर धरल्याचे दिसून आले.
नांदोकार यांनी यासाठी स्वीकारला आमरण उपोषणाचा मार्ग…
उपोषण करते विशाल नांदोकार या युवकाने आमरण उपोषणाला का बसलो याबाबत पालकमंत्री नामदार बच्चू कडू यांना आप बीती सांगितली त्यामध्ये नांदोकार म्हणाले की एक दिवस मी व माझी पत्नी शेगाव येथे गजानन महाराजांच्या दर्शनाकरिता जात असताना वाटेत एका महिलेची खड्डेमय रस्त्यांमुळे चार चाकी गाडी मध्येच प्रसूती झाली तेव्हा त्या नवजात बालकाची नाळ एका दगड़ाने तोडावी लागली या सर्व घटनेला तालुक्यातील रस्त्यांची बिकट परिस्थिती जबाबदार होती त्यामुळे ही बाब माझ्या मनाला चटका लावून गेल्याने ही परिस्थिती अजून कुणाच्या नशिबी येऊ नये म्हणून मी दिनांक 26 जून पासून आमरण उपोषणाला बसलो असे नांदोकार यांनी पालकमंत्र्यांना सांगितले यावेळी नांदोकार यांचे मन भरून आले होते
तेल्हारा तालुक्यातील रस्त्यांच्या कामावर देखरेख समितीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते गठण
या समितीमध्ये विशाल नांदोकार, उज्वल दबडघाव,रामभाऊ फाटकर,धिरज बजाज,आषिश जैस्वाल,आनंद राठी, प्रविण पोहरकार, डॉ शहनाज खान, सचिन थाटे,प्रा.स्वप्निल फोकमारे , क्रांती कुमार टोहरे,यांचा समावेश आहे .