अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातुर – डॉ. एच. एन. सिन्हा कला व वाणिज्य महाविद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समारंभ 15 ऑगस्ट 2022 रोजी सोमवारला संपन्न झाला. स्वातंत्र्यदिनी सकाळी 8 वाजता प्राचार्य डॉ. किरण. एस. खंडारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर दिवसभरात विविध कार्यक्रम राबवण्यात आले. परिसरातील माजी सैनिकांचा सत्कार घेण्यात आला त्याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. किरण. एस. खंडारे हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हनुन श्री. दीपक बाजड तहसीलदार पातुर तर,प्रमुख अतिथी श्री विजय खेडकर नायब तहसीलदार पातुर, श्री तुकाराम निलखन अध्यक्ष माजी सैनिक संघटना पातुर, श्री.देविदास निमकंडे उपाध्यक्ष माजी सैनिक संघटना,श्री. प्रशांत नीलकंठ सचिव, श्री अंबादास टप्पे कोषाध्यक्ष,श्री. महादेव परमाळे सदस्य, श्री.दिगंबर गाडगे, श्री. दीपक तिडके , श्री.रमेश कराळे श्री.विजय जाधव,श्री. वसंत बंड शहीद माता सौ.मंदाताई निमकंडे शहीद पिता श्री. काशीराम निमकंडे , श्री. मोरेश्वर नाभरे, श्री. संजय बगाडे विचार पिठावर उपस्थित होते. सदर समारंभाला 25 माजी सैनिक उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतीमा पुजन व दिपप्रज्वलन करुन झाली. याप्रसंगी मोहम्मद जमील यांनी स्वागत गीत सादर केले.त्यानंतर सर्व माजी सैनिकांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्तावीक प्रा.अतुल विखे यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी महाविद्यालयात अमृत महोत्सव निमित्त आयोजित विविध कार्यक्रमांचा आलेख मान्यवरांच्या समोर मांडला. याप्रसंगी तहसीलदार दीपक बाजड यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या व स्वातंत्र्यवीरांच्या आठवणींना उजाळा दिला त्याचप्रकारे देशासाठी लढणाऱ्या माजी सैनिकांच्या सत्कार हा तालुक्याच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे आणि तो या महाविद्यालयाने राबविला याबद्दल महाविद्यालय व विशेषत: महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण. एस. खंडारे यांचे कौतुक केले.कार्यक्रमाला उपस्थित अनेक माजी सैनिकांनी आपल्या सैन्य सेवेतील विविध घटना कथन केल्या. अनेक माजी सैनिकांचे शिक्षण याच महाविद्यालयात झाले असल्याने त्यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक सांस्कृतिक व सामाजिक विकासावर दृष्टिक्षेप टाकत महाविद्यालयाप्रती कृतज्ञता व्यक्त केली व महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या विविध जनकल्याणकारी उपक्रमांची प्रशंसा केली.एका माजी सैनिकाने बासरी वादनातून ए मेरे वतन के लोगो हे गीत सादर केले त्याचबरोबर सैन्य संचालनातील विविध धून सादर केल्या. महाविद्यालयातील महिला प्राध्यापिका व विद्यार्थिनींनी सैनिकांना राखी बांधून रक्षाबंधन उत्सव साजरा करण्यात आला. दि. 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत घेतलेल्या निबंध स्पर्धा , काव्य स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, “वीरगाथा पोस्टर स्पर्धा”यामधील उत्कृष्ट स्पर्धकांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यामधून उत्कृष्ट सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आले. वरिष्ठ महाविद्यालय उत्कृष्ट सेवा पुरस्कार ग्रंथपाल प्रा.अतुल विखे व कनिष्ठ महाविद्यालय उत्कृष्ट सेवा पुरस्कार प्रा.नलिनी खोडे यांना देण्यात आला. उच्च माध्यमिक व्यावसायिक अभ्यासक्रम उत्कृष्ट सेवा पुरस्कार प्रा. गजानन जवंजाळ यांना देण्यात आला.शिक्षकेतर कर्मचारी उत्कृष्ट सेवा पुरस्कार शंकरराव ताले व महाविद्यालयीन विद्यार्थी उत्कृष्ट सेवा पुरस्कार अजय घुले यांना देण्यात आला. माजी सैनिकांच्या सत्कार सोहळ्यामध्ये राष्ट्रगान स्पर्धा ही लक्षवेधी ठरली. प्राचार्य डॉ. किरण. एस. खंडारे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये स्वातंत्र्यवीरांनी केलेल्या बलिदानाच्या आठवणी तसेच महाविद्यालयामध्ये वर्षभर पार पडणाऱ्या राष्ट्रभक्ती पूरक उपक्रमांची माहिती दिली. तसेच संस्थेच्या आणि महाविद्यालयाच्या शैक्षणिक विकासाच्या प्रगतीचा आलेख मांडला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाच्या सांस्कृतिक समिती समन्वयक डॅा. दिपाली घोगरे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. रोनिल आहाळे यांनी केले.या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली .याप्रसंगी डॉ व्ही.जी.वसू , प्रा.डॉ.ममता इंगोले, डॉ.संजय खांदेल,डॉ.अनिल देशमुख, प्रा. हर्षद एकबोटे , प्रा.सारिका पाचराउत, प्रा. सुरेश लुंगे,प्रा. विवेक डिवरे,प्रा.अरविंद भोंगळे,श्री. चंद्रकांत अमानकर तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू-भगिनी शिक्षक तसेचं शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रम संपल्यानंतर मान्यवरांनी ग्रंथालयामधील ग्रंथ प्रदर्शनीला भेट दिली. या ग्रंथ प्रदर्शनीमध्ये भारताचे संविधान, स्वातंत्र्यवीरांच्या कथा,महाकाव्य, विविध टीकात्मक ग्रंथ,सांस्कृतिक पुस्तके, राजनीति ग्रंथ, तत्त्वज्ञान, विज्ञान, विविध शब्दकोश, समाजशास्त्रीय कोश,स्पर्धा परीक्षेची पुस्तके, संशोधन पर ग्रंथ इत्यादी मौलिक ग्रंथसंपदा दर्शकांना वाचनीय आनंदाची अभिरुची निर्माण करणारी होती. या प्रदर्शनीमध्ये निवडलेल्या पुस्तकांची दखल घेत मान्यवरांनी प्राचार्य, ग्रंथालय विभाग प्रमुख व सहकाऱ्यांचे, कौतुक केले. दि. 13 ऑगस्ट पासून सुरु झालेल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता सामूहिक राष्ट्रगीताने झाली.


