अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातुर : दिनांक 18 ऑगस्ट 2022 स्थानिक तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पातुर येथे समता दूत प्रकल्प अंतर्गत समाज कल्याण विभाग अकोला यांच्या मार्फत करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील जवळजवळ १४०० विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाला मार्गदर्शन श्री वैभव निमकर अमरावती आणि समता तायडे समाज कल्याण विभाग अकोला यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रतिष्ठान बार्टी पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला उपस्थित विद्यालयाचे प्राचार्य अंशमानसिंह गहिलोत, उपप्राचार्य एस बी चव्हाण ,उपमुख्याध्यापीका आर एस ढेंगे, पर्यवेक्षक एमबी परमाळे होते.