अकोला : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा पुर्व परीक्षा रविवार दि. 21 ऑगस्ट 2022 रोजी होणार आहे. अकोला शहरातील एकूण 12 उपकेंद्रावर सकाळी 8 ते 5 या वेळेत ही परीक्षा होणार आहे. ही परीक्षा शांत व सुरक्षित वातावरणात पार पाडावी यासाठी सर्व परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्याचे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी दिले आहेत.
यासंदर्भात जारी केलेल्या आदेशात म्हटल्यानुसार परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नये तसेच कायदा व सुवव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये रविवार दि. 21 ऑगस्ट रोजी सकाळी सहा ते सायंकाळी आठ यावेळात सर्व 12 परीक्षा केंद्राच्या आतील संपूर्ण परिसरात व केंद्राचे बाहेरील लागून 100 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.
उपकेंद्राचे नाव व पत्ता :
- शिवाजी आर्ट, कॉमर्स अन्ड सायन्स कॉलेज मोर्णा बिल्डींग, शिवाजी पार्क, अकोट रोड अकोला.
- प्रभात किड्स, वाशिम रोड,अकोला
- सिताबाई कला महाविद्यालय सिव्हील लाईन रोड.
- एल.आर.टी.कॉलेज ऑफ कॉमर्स रतनलाल प्लॉट सिव्हील लाईन नेकलेस रोड,अकोला भाग-ए
- एल.आर.टी.कॉलेज ऑफ कॉमर्स रतनलाल प्लॉट सिव्हील लाईन नेकलेस रोड भाग-बी
- मांगीलाल शर्मा विद्यालय वानखडे नगर, डाबकी रोड, अकोला
- शिवाजी हायस्कुल मुख्य शाखा देशमुख पेठ शिवाजी पार्कजवळ अकोट रोड, अकोला
- उस्मान आझाद ऊर्दू हायस्कूल रतनलाल प्लॉट चौक,अकोला
- ज्युबिली इंग्लिश हायस्कूल/ज्युनिअर कॉलेज रामदासपेठ पोलीस स्टेशनजवळ अकोला
- न्यु इंग्लिश हायस्कूल रामदासपेठ पोलीस स्टेशनजवळ अकोला
- आदर्श विद्यालय आदर्श कॉलनी अकोला
- भारत विद्यालय तापडीया नगर.
- आदेशात नमूद केल्यानुसार या सर्व परीक्षा केंद्रांच्या परिसरात प्रवेश करतेवेळी पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्रीतरित्या प्रवेश करणे, परीक्षा केंद्र परिसरात घोषणा देणे, यास मनाई करण्यात आली आहे. तसेच परीक्षा केंद्रावर प्रवेश करणाऱ्या सर्व परीक्षार्थी, अधिकारी, कर्मचाऱ्यांचे थर्मल, इफ्रारेड थर्मामिटरद्वारे तापमान तपासण्यात यावे, सर्व पर्यवेक्षकांची रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करणे अनिवार्य आहे. परीक्षा केंद्राच्या परिसरात परीक्षार्थी अथवा अन्य व्यक्तींकडून शांततेत बाधा निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करण्यात येणार नाहीत. परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर, फॅक्स मशीन, पानपट्टी, लॅपटॉप, टायपिंग सेंटर, एसटीडी, ध्वनीक्षेपक इत्यादी माध्यम परीक्षा संपेपर्यंत बंद ठेवण्यात येतील. परीक्षा केंद्राचे परिसरात इंटरनेट, मोबाईल, फोन, सेल्युलर फोन ई-मेल व इतर प्रसार माध्यमे घेऊन प्रवेश करण्यास मनाई राहील. परीक्षा केंद्रावर कोणत्याही अनाधिकृत व्यक्ती, वाहनास प्रवेशास मनाई राहील. कोविड अनुरुप वर्तनाचे पालन करावे. उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश परीक्षा केंद्रावर नियुक्त अधिकारी, कर्मचारी, परीक्षार्थी तसेच परीक्षा केंद्रावर देखरेख करणारे अधिकृत अधिकारी, कर्मचारी व पोलीस अधिकारी यांचेबाबत परीक्षा संबंधित कर्तव्य पार पाडण्याचे दृष्टीने लागू राहणार नाहीत,असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.