मुख्यमंत्री योगींनी परिवहन विभागाच्या टेस्टिंग ट्रॅक आणि ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर अलिगढ, बरेली, झाशी आणि सारथी हॉल फिरोजाबादचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. रक्षाबंधनाच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी उत्तर प्रदेशला नवीन बसेसची सर्वोत्तम भेट दिली आहे.
नवी दिल्ली : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी लखनऊमध्ये १५० नवीन बीएस-६ डिझेल बसचे उद्घाटन केले. त्याचसोबत मुख्यमंत्री योगींनी परिवहन विभागाच्या टेस्टिंग ट्रॅक आणि ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर अलिगढ, बरेली, झाशी आणि सारथी हॉल फिरोजाबादचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. रक्षाबंधनाच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी उत्तर प्रदेशला नवीन बसेसची सर्वोत्तम भेट दिली आहे. विमानतळांच्या धर्तीवर बसस्थानकांचा विकास करायला हवा, असे मुख्यमंत्री योगी यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री योगी म्हणाले की, लवकरच ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिला उत्तरप्रदेशमध्ये बसमधून मोफत प्रवास करता येणार आहे. बुधवारी रात्री १२ वाजल्यानंतर १२ ऑगस्टच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत राज्यातील सर्व महिलांना मोफत प्रवास करता येणार आहे. तसेच, राज्यातील सर्व ७५ जिल्ह्यांना पहिल्या टप्प्यात प्रत्येकी दोन नवीन बसेस मिळणार आहेत, असेही त्यांनी सांगितलं.


