नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्रालयाकडून (Ministry of Home Affairs) तपासातील उत्कृष्ट कामगिरीसाठीचे पदकं जाहीर करण्यात आली आहेत. 2022 सालासाठी देशातील 151 पोलीस अधिकाऱ्यांना पदके जाहीर करण्यात आली आहे.
यामध्ये सीबीआयचे (CBI) 15 अधिकारी, महाराष्ट्रातील (Maharashtra Police) 11, मध्य प्रदेश 10, उत्तर प्रेदश 10, केरळ 8, राजस्थान 8 आणि पश्चिम बंगालमधील आठ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या राज्यांसोबतच तेलंगा, कर्नाटक, ओडिशा, आंध्र प्रदेश, हरियाणा, पंजाब तामिळ नाडू, गुजरात, छत्तीसगड, बिहार या राज्यामधील पोलीस अधिकाऱ्यांना देखील तपासातील उत्कष्ट कामगिरीसाठीचे पदकं जाहीर झाली आहेत. याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तपासात उत्कृष्ट कामगिरी बजावल्यामुळे ही पदके जाहीर होत असतात. 2022 सालासाठी देशातील ज्या 151 पोलीस अधिकाऱ्यांना पदके जाहीर करण्यात आली आहेत त्यामध्ये महाराष्ट्राच्या एकूण 11 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील पदक प्राप्त पोलीस
केंद्रीय गृहमंत्रालयाकडून तपासातील उत्कृष्ट कामगिरीसाठीचे पदकं जाहीर करण्यात आली आहेत. 2022 सालासाठी देशातील 151 पोलीस अधिकाऱ्यांना पदके जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील 11 पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाचा समावेश आहे. कृष्णकांत उपाध्याय, प्रमोद भास्करराव तोरडमल, मनोज मोहन पवार, दिलीप शिशुपाल पवार, अशोक तानाजी विरकर, अजित भागवत पाटील, राणी तुकाराम काळे, दीपशिखा दीपक वारे, सुरेशकुमार नानासाहेब राऊत, जितेंद्र बोडप्पा वनकोटी आणि समीर सुरेश अहिरराव या अकरा जणांना तपासातील उत्कृष्ट कामगिरीसाठी पदक जाहीर झाले आहे.
सीबीआयच्या 15 अधिकाऱ्यांना पदक
दरम्यान दुसरीकडे सीबीआयच्या 15 अधिकाऱ्यांना देखील तपासातील उत्कृष्ट कामगिरीसाठीचे पदकं जाहीर झाले आहे. यामध्ये सुरेंदर कुमार रोहिल्ला, प्रमोद कुमार,संदीप सिंह भदौरिया,मनोज कुमार, कुमार भास्कर,हेमांशु शहा,संभाजी निवृत्ती,एम. शसिरेखा, श्रीधर डी, सत्यवीर,साजी शंकर,दीपक कुमार, अनुज कुमार, अमित अवदेश श्रीवास्तव,प्रदीपकुमार त्रिपाठी यांच्या नावाचा समावेश आहे.