अकोला : तालुकास्तरीय तसेच नगरपालिकानिहाय कोविड लसीकरणाच्या बुस्टर डोस लसीकरण सत्रांचे आयोजन करा, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले. कोविड लसीकरणाच्या सद्यस्थितीबाबत जिल्हाधिकारी यांच्या दालनात आज आढावा घेण्यात आला. या बैठकीस शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ, सुरेश आसोले, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत पवार, जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी डॉ. कारंजकर, डॉ, मनिष शर्मा, डॉ. अनुप चौधरी, डॉ. श्याम शिरसाम आदी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाच्या लसीकरण टीमचे अभिनंदन केले. बुस्टरडोस कामगिरीत जिल्ह्याचे स्थान आता १२ व्या क्रमांकावर आहे. तसेच कोविड काळात काम केलेल्या आरोग्य अधिकाऱ्यांचा नुकताच पुणे येथे सन्मान झाला, त्याबद्दलही सर्व आरोग्य अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. कोविड लसीकरणाला वेग येण्यासाठी आता तालुका व नगरपालिकास्तरावर आरोग्य यंत्रणा, शासकीय कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय यांच्या लसीकरण सत्रांचे आयोजन करा,असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले.