अकोला : भारतीय हवामान विभाग यांच्याकडून प्राप्त संदेशानुसार आज दि.८ पासून ते दि. १२ पर्यंत जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सततच्या पावसामुळे काटेपूर्णा, वान, दगडपारवा,मोर्णा, निर्गुणा या प्रकल्पा मधुन पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो. त्याअनुषंगाने या कालावधीत नदी नाला काठावरील गावांना व शहरी भागातील सखल भागातील वस्त्यांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदी, नाले, तलाव, बंधारे येथे जलसाठा जमा होत असल्याने त्यामध्ये पोहण्यास जाऊ नये. रस्त्यावरून, पुलावरुन पाणी वाहत असल्यास वाहने नेण्याबाबत दक्षता घ्यावी. तसेच स्थितीच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी योग्य ती दक्षता घ्यावी,असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले आहे.


