अभिजीत फंडाट
ग्रामीण प्रतिनिधी मोरगाव भाकरे
मोरगाव भा.: सततची नापिकी, शेतमालाला भाव न मिळणे यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल परिस्थितीत आहे. त्या अन्न दात्याला काही मदत करण्याच्या हेतुने अकोला युनिट कार्यकारिणीने आज 31.05.22 रोज शनिवार रोजी सायंकाळी 6 वाजता 150 शेतकरी बांधवांना प्रत्येकी 2किलो तुर पिकांचे 3 क्विंटल बियाणे वाटप करण्यात आले. यासाठी आम्ही आपल्या सदस्यांना सुध्दा मदतीचे आव्हान केले. त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला, सर्व आश्रयदात्यानी यावेळी सुद्धा उदात्त अंतकरणाने मदत करून आम्हाला पाठबळ दिले,यामध्ये प्रामुख्याने
दिलीप काळे अध्यक्ष अकोला युनिट,अरुण महिंद्रे, मनिष अग्रवाल, राधेश्याम चिराणीया, मिना अग्रवाल, विनायक क्षिरसागर,सुधीर देशपांडे, ज्ञानेश्वर रुपवणे,गजानन मालोकार,प्रकाश गोसावी, मिलिंद कोवले, विजय गोखले, मंगेश दुबे, दिवाकर पाटील, प्रभू व श्रीनिश भागवत, प्रदिप जोशी, नरेंद्र पाटील, गोपाल चौधरी, विजय औतकार, विलास पाटील, राजेंद्र गावंडे, विश्वजित रोठे, सुरेश गर्दे, हर्षल बहादुरे, दादाराव पवार, अरुण गावंडे, श्रीकांत बाहेकर यांनी आर्थिक योगदान दिले. कार्यक्रमाच्या सुरवातीला या उपक्रमास ,सौ.शुभांगी भटकर प.स.सदस्य, गावच्या सरपंच सौ. उमाताई माळी, सरपंच सौ. अर्चना चोपडे, गोपाल भाकरे अध्यक्ष सेवा सहकारी सोसायटी यांचे पुष्पगुछ देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अकोला युनिट चे कार्याध्यक्ष शरद भागवत यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगितेतील ” ग्राम सुधारणेचा मूलमंत्र, सज्जनांनी यावे एकत्र, संघटन हेची शक्ती चे सूत्र, ग्रामराज्य निर्माण करी, ” या ओवीने करून युथ हॉस्टेल द्वारा राबवीण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली, समाज कार्यामध्ये गावातील तरुण वर्गाने पुढे येऊन रक्तदान शिबीर आयोजित करून आपला खारीचा उचलावा, असे सांगून रक्तदानाचे महत्व सांगितले, त्याला गावकऱ्यांनी प्रतिसाद दिला व शिबीर आयोजित करण्याचे आश्वासन दिले. तसेच या उपक्रमात योगदान देणाऱ्या आश्रयदात्यांचे आभार मानले. हा उपक्रम राबवीन्यासाठी गावातील प्रतिष्ठित दिपक भाकरे, सुरेश भटकर, संतोष खिराळे व गावकरी मंडळी यांनी मदत केली,उपस्थित सर्व पाहुणे मंडळी यांच्या शुभहस्ते बियाणे वितरित करण्यात आले. तसेच हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अकोला युनिट चे कार्याध्यक्ष शरद भागवत, सचिव विलास पाटील,श्रीकांत बाहेकर,विजय औतकर, श्रद्धांनंद बिहाडे मिलिंद कोवले, गणेश वाघ व संपूर्ण कार्यकारी संचालक यांनी परीश्रम घेतले.

