किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
वाडेगाव : येथे आयोजित करण्यात आलेल्या धनुर्विद्या तसेच मल्लखांब प्रशिक्षण शिबिराचा समारोप संपन्न झाला. जय बजरंग व्यायाम शाळेचे संस्थापक माजी आमदार प्रा तुकाराम बिडकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक जय बजरंग व्यायाम शाळा चे वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे दिनांक 1 मे ते 1 जुन या कालावधी मध्ये सदर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरा मध्ये शंभर विद्यार्थी सहभागी झाले होते शिबिराच्या समारोपीय कार्यक्रम गजानन इंगळे यांचे अध्यक्षतेखाली, जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर चिंचोळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ हिंमतराव घाटोळ, राठोड मॅडम, विद्यमान पंचायत समिती सदस्या सौ रुपालीताई काळे, माजी पंचायत समिती सदस्य बब्बू भाई ठेकेदार, माजी उपसरपंच बळीराम घाटोळ, डॉ कृष्णराव भुस्कुटे, डॉ राजेश चिंचोळकर, प्रा नितीन मानकर शामलाल लोध सह अनंता काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित होण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर चिंचोळकर यांनी एक लाख रुपयांची देणगी देण्याचे आपल्या मनोगतातुन जाहीर केले. त्यावेळी प्रशिक्षण शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी उपस्थित मान्यवरांच्या समोर धनुर्विद्या, मल्लखांब तसेच ईतर मैदानी, साहसी खेळाचे उत्कृष्ट सादरीकरण केले. तद्वतच उपस्थित मान्यवर यांचे हस्ते राष्ट्रीय स्तरावर खेळाडूचे नेतृत्व केल्यामुळे आशिष जठाळ, सुरज जढाळ, राहुल पवार, मंथन भातारकर, अंकुश मसने, तसेच मेघना अवचार यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन प्रा निखिल नावकार, प्रास्तविक जय बजरंग व्यायाम शाळेचे प्रशिक्षक मोहन भातारकर यांनी तर प्रा राजदत्त मानकर यांनी आभार प्रदर्शन केले. संपूर्ण प्रशिक्षण शिबिर व कार्यक्रम यशस्वीतेसाठी व्यायाम शाळेचेआजी माजी विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले.











