वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या वीर पराक्रमाच्या गर्जनांनी दुमदुमली पातूर नगरी
किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातूर शहरात पै.अंकीत बायस व मित्र परिवार यांच्या नेतृत्वाखाली शेकडो तरुण युवकांनी दुचाकी रॅली काढून पातुर शहराच्या प्रमुख मार्गांनी महाराणाजींच्या नावाचा जय घोष करीत शहर प्रदक्षिणा करून महाराणा प्रताप यांची जयंती उत्साहात साजरी केली. पातुर शहरातील प्रमुख चौकातील महाराणा प्रताप चौक टि.के.व्ही. तसेच छत्रपती संभाजी चौक,जुने बस स्थानक पोलीस स्टेशन चौक या मुख्य चौकांमध्ये महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन करून पातूर शहरातील तरुण युवकांनी महाराणा प्रताप जयंतीचा उत्सव साजरा केला.
पातुर शहराच्या तहसील कार्यालयात राष्ट्रपुरुष महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून त्यांना शासकीय मानवंदना देण्यात आली.नायब तहसीलदार खेडेकर यांनी यावेळी जयंतीच्या सर्व समाज बांधवांना शुभेच्छा देत सर्व राष्ट्रपुरुषांच्या जयंती दिनी समाजाभिमुख कार्यक्रम उत्साहात साजरे व्हायला हवे असा चांगला संदेश उपस्थितांना दिला.यावेळी पातुर तालुका विकास मंचाचे संयोजक ठा.शिवकुमारसिंह बायस बोलतांना म्हटले की महाराणा प्रताप यांच्या ऐतिहासिक पराक्रमाचे तरुण युवकांमध्ये महाराणा प्रताप,छत्रपती श्री शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज,बसवेश्वर महाराज,गुरू गोविंदसिंग,राजश्री शाहू महाराज,महात्मा ज्योतीबा फुले, महात्मा गांधी,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,स्वातंत्र्यवीर सावरकर व इतर राष्ट्रपुरुष यांच्या विषयी नेहमी आदर,सद्भावना निर्माण व्हावी.त्यांचे विचार आत्मसात करून राष्ट्रासोबतच धर्माचे रक्षणासाठी इतिहास कालीन बाबींना लक्षात घेता तरुण युवकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विजयसिंह गहिलोत,माजी नगरपरिषद उपाध्यक्ष राजू उगले,धारकरी विजय राऊत,धारकरी सुभाष देवकर,श्रीराम सेना विदर्भ अध्यक्ष मंगेश गाडगे,युवा सेना तालुका अध्यक्ष सागर रामेकर, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष राहूल वाघमारे,राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष कृष्णा बोंबटकार,भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष सचिन बारोकार माळी युवक संघटना जिल्हाध्यक्ष चंदू बारताशे,राजपूत संघटना पातुरचे अध्यक्ष बबलू उर्फ राकेशसिंह बायस,भाजपा शहर उपाध्यक्ष राजू आवटे,डॉ संजय परिहार,जगनमोहन गहिलोत,बंटी उर्फ गोविंदसिंह गहिलोत,किरणकुमार निमकंडे, पंचायत समिती सदस्य अनिल राठोड,चंदू वस्ताद वानखडे,सुधाकर शिंदे,चक्रधर माळी,मेजर रविंद्र श्रीनाथ,मधुकर राखोंडे,विनोद तेजवाल,धीरज परिहार,अतुल बायस,धारकरी प्रमोद श्रीनाथ रामेश्वर वाडी,सुरेश माहुलीकर,गणेश गाडगे,विठ्ठल डिके,प्रल्हाद गवई,पवन तायडे,मंगेश बोरकर,वैष्णवी राऊत व इतर गणमान्य नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजपूत समाज संगठना,श्री सिदाजी महाराज व्यायाम शाळा,जय भवानी व्यायाम शाळा,जय मुंगसाजी माऊली मित्र मंडळ,आई तुळजाभवानी मित्र मंडळ,पिंपळेश्वर व्यायाम शाळा,श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान,पातुर तालुका विकास मंच यांनी विशेष परिश्रम घेतले.











