किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
अकोला जिल्हा होमगार्ड संघटनेच्या वतीने माणिकराव भंडगे होलार समाज संघटक महाराष्ट्र राज्य मुंबई.व दीपक कांबळे माजी तालुका समादेशक मुंबई तसेच जगदेवराव बाहेकर माजी जिल्हा समादेशक बुलढाणा यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानपुर्वक सत्कार करण्यात आला.
गेल्या कित्येक दिवसापासून होमगार्डच्या मागण्या प्रलंबित होत्या.त्यापैकी काही मागण्या मंजूर करण्यात आल्या.आणि या सर्व गोष्टीचा पाठपुरावा करणारे माणिकराव भंडगे व दीपक कांबळे हे होमगार्डच्या विविध अडचणी शासन दरबारी नेऊन मार्गी लावत आहेत. तर काही प्रलंबित मागण्या मंजूर करण्यात आल्या.त्या अनुषंगाने होमगार्ड्स अकोला जिल्ह्याच्या वतीने एका सभेचे आयोजन बार्शिटाकळी प्रभु पार्वती मंगल कार्यालय या ठिकाणी करण्यात आले होते. त्या ठिकाणी महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून होमगार्ड सैनिक,अधिकारी यांनी या सभेला हजेरी लावली व मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माणिकराव भंडगे
होते.तर प्रमुख पाहुणे दीपक कांबळे,जगदेवराव बाहेकर होते.या कार्यक्रमांमध्ये आणखी काही तक्रारी दाखल करण्यात आल्या व अन्याया विरुद्ध लढा देणार असल्याचे माणिकराव भंडगे यांनी आपल्या भाषणा मध्ये सांगितले.होमगार्डच्या विविध अडचणी सोडविण्याचे,मार्गी लावण्याचे भंडगे यांनी आश्वासन दिले.आता जिल्ह्याच्या ठिक ठिकाणी जाऊन होमगार्डच्या अडचणी संदर्भात सभा घेऊन समस्या सोडविण्याचे प्रयत्न करत आहेत.अकोला जिल्ह्यातील सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन प्रभू पार्वती मंगल कार्यालय बार्शी टाकळी येथे करण्यात आले होते.कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन होमगार्ड केदारे यांनी केले. कार्यक्रमाचे शेवटी राष्ट्रगीताने सांगता झाली. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता समादेशक अधी.तथा महिला पत्रकार संगीता इंगळे,समादेशक सुरेश नाठे,समादेशक राजु खडसे,समादेशक डॉ संतोष धबाले,समादेशक नाईक, यांचे विशेष सहकार्य लाभले.तसेच
अकोला जिल्ह्यातील पातुर,बाळापुर,अकोट,
मूर्तिजापूर,अकोला अशा पाच तालुक्यातील.मानसेवी अधिकारी,पलटन नायक अधिकारी व तसेच महिला पुरुष होमगार्ड सैनिकांनी अथक परिश्रम घेतले.हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.











