महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रवती दि.2:- दि.१ जून रोजी सर्वत्र साजरा करण्यात येणा-या जागतिक पालक दिनी येथील भोज वार्डातील नागरिकांनी वृक्षांचे पालकत्व स्वीकारुन पर्यावरण संरक्षण करण्याचा धागा हाती घेतला आहे. नैसर्गिक पर्यावरण संरक्षण व मानवता विकास संस्थेचे उपाध्यक्ष श्रीपाद बाकरे यांच्या माध्यमातून सदर नागरिकांनी हे पालकत्व स्वीकारले आहे. तसेच वर्षानुवर्षे वृक्षांचे संगोपन करण्याचा मानसही नागरिकांनी यावेळी व्यक्त केला.याप्रसंगी नेफडो उपाध्यक्ष श्रीपाद बाकरे, उदगार चटपल्लीवर,विनोद आत्राम, रमेश आगलावे, वैदेही राऊत, कविता श्रीरामे, पूजा माटे, राधा कवासे, रेणुका राऊत, यशस्वी श्रीरामे, दुर्गा राऊत उपस्थित होते.











