शरद भेंडे
ग्रामीण प्रतिनिधि अकोट
रामपूर- रामपूर येथील गरजू लाभार्थी पंतप्रधान घरकुल योजनेतून वंचित राहिले आहेत. ज्यांचे पक्के मकान आहे अशांना घरकुल मंजूर झाले. तसेच अगोदर वडिलांचे नंतर मुलाच्या नावे असे एकाच घरात दोन दोन घरकुल मिळाले आहेत.
ग्रामपंचायत भोंगळ कारभारामुळे व ग्रामसेवक पायघन यांच्या हलगर्जीपणामुळे हेतुपुरस्पर रामपूर सुकळी शाहनूर राहणापुर या सातपुड्याच्या पायथ्याशी असणारे आदिवासी बहुल गावातील नागरिकांना घरकुल योजनेतून डावलण्यात आले आहे. काहींच्या फाईली ऑनलाइन केले गेले नाही तर काहीचे फाईली मध्ये व ग्रामसेवक यांच्या संगनमताने हेतुपुरस्सर त्रुटी ठेवल्या आहेत. ज्यांना घरकुल ची गरज नाही घरकुलाचा लाभ घेऊन त्या जागेत गुरेढोरे बांधतात अशांना ग्रामसेवक यांनी घरकुल मंजूर केले व ताट्यांच्या घरात राहतात ज्यांना खरोखरच घरकुल ची गरज आहे अशा गरजू लाभार्थ्यांना हेतुपुरस्पर डावलण्यात आले. 2018 पासून नमुना 8 मध्ये अतिक्रमण दाखविल्यामुळे घरकुल लाभार्थी वंचित राहत आहेत .शासन निर्णयानुसार लाभार्थ्यांची अतिक्रमण नियमाकुल करून घरकुल देण्याचे आदेश आहेत.रामापुरसह परिसरातील गावातील नागरिकांचे अनेक वर्षापासूनचे अतिक्रमण नियमाकुल करून त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी येथील नागरिकांनी 2018 पासून घरकुल चे फाईली ग्रामसेवक यांच्याकडे दिले आहेत व ते तोंडी सांगतात की फाईली ऑनलाईन केल्या आहेत, प्रत्यक्षात त्या फाईली धूळ खात पडलेले आहेत. ग्रामसेवकाने हलगर्जीपणा व हेतुपुरस्सर या लाभार्थ्यांना घरकुल पासून वंचित ठेवले आहे. अशा आशयाचे निवेदन तहसील कार्यालयाला देऊन आमचे अतिक्रमण नियमित करून आम्हाला घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.