गोवा येथे ५ जूनला होणार पुरस्कार प्रदान
विकास ठाकरे
तालुका प्रतिनिधी अकोला
अकोला : अकोला जिल्ह्यात अनेक वर्षापासून नावलौकिक असलेले व विविध वृत्तपत्रात आपला ठसा उमटविणारे विविध प्रकरणाचा भंडाफोड करून भ्रष्टाचाराचा वाचा फोडणारे कर्तव्यदक्ष म्हणून ओळख असलेले अकोला येथील पत्रकार तथा दै. विदर्भ केसरी चे कार्यकारी संपादक बाळासाहेब ठाकरे त्यांना यांना नुकताच राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार म्हणून घोषित झाला आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी विविध वृत्तपत्रातून काम केले आहे. तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ संघाचे जिल्हाध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते, अण्णा हजारे भ्रष्टाचार म्हणून निर्मुलन समितीचे जिल्हा अध्यक्ष त्यांनी काम केले आहे अंधश्रद्धा निर्मूलन समिती तसेच विविध सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत त्यांनी त्यांनी विविध शिबिर, आंदोलन, उपोषण तसेच पत्रकार मेळावे, योगा मेळावे, साहित्य, संमेलने घेऊन जनसमस्या सोडविल्या आहेत ठाकरे यांना शुभम कुमार बाल साहित्य संघ अकोला, संघर्ष पुरस्कार, आनंद साहित्य
पुरस्कार, कोरोना योध्दा पुरस्कार असे इतर पुरस्कार देऊन सुद्धा सन्मानित करण्यात आले आहे अनेक प्रकारचे विविध कार्यक्रम राबवून त्यांनी जनतेच्या समस्याचे निराकरण केले आहे त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार येत्या 5 जून 2022 रोजी गोवा येथे शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनच्या वतीने आयोजित होणाऱ्या अखिल भारतीय पहिले शिव मराठी साहित्य संमेलनतील कार्यक्रमात सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, साहित्यिक, पत्रकार, संपादक, उपस्थित राहणार आहेत तसेच राज्यभरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे बाळासाहेब ठाकरे यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार घोषित झाल्याबद्दल त्यांचा अकोला येथील गुरुकुल ऍक्टिंग अकॅडमी, छत्रपती संभाजी महाराज विचार मंच अकोला, शिवशंभु संघटना अकोला, शिवा मोहोड मित्र मंडळ व समस्त पत्रकार संघटना अकोला यांच्या वतीने अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या पुरस्कार प्रदान कार्यक्रमाला व अ. भा. साहित्य संमेलनांला जास्तीत जास्त नागरीकांनी उपस्थित राहावे आव्हान शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे अध्यक्ष शिवचरण उज्जैनकर यांनी केले आहे.