किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातूर : ग्रामपंचायत मधील घरकुल व 15 वित्त आयोगाच्या संदर्भात अकोला जिल्हा परिषद येथे आढावा बैठकीत अकोला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांचे सचिवांवर कारवाईचे आदेश
पातूर पंचायत समिती अंतर्गत येनाऱ्या दोन ग्रामसेवक यांच्या वर कारवाई करण्यात आली असून सविस्तर माहिती असी आहे की ग्रामसेवक पातूर तालुक्यातील उमरा ग्रामपंचायत सचिव उंडाळ व आघिखेड, चांन्नी,चतारी येतिल ग्रामपंचायत चा पदभार ग्रामपंचायत सचिव पिपळकर हे पाहत होते परंतु शासनाच्या नियमानुसार 15 वित्त आयोगातील,व घरकुल संबंधित निधीचे नियोजन करणे आवश्यक होते त्या अनुषंगाने अकोला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी अकोला जिल्ह्यातील तालुकास्तरीय ग्रामपंचायत आढावा सभा सप्ताह सुरू असताना 27/05 /2022 रोजी बाळापुर पातुर तालुक्यातील ग्रामपंचायत सचिव यांचा ग्रामपंचायत मधील पूर्ण विषयांचा आढावा घेतला असता या दोन सचिवांच्या त्रुटी लक्षात घेता यांच्यावर कारवाईचे आदेश दिले या दोघां सजीवांवर निलंबनाची टांगती तलवार लटकली असुन, निलंबन होईल की? काय कारवाई होईल याकडे सर्व ग्रामपंचायत सचिव ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे त्याचप्रमाणे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बाळापूर तालुक्यातील सुद्धा काही सचिवांवर कार्यवाही करण्यात आली आहे.











