अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगाव
मालेगाव – यास्मिनचे वडिलां कडे फक्त 5 एकर शेती आहे .आई वडील भाऊ शेतात मजुरी करतात . इयत्ता 12 वी तिने पातूर येथील शाहबाबू उर्दू हायस्कूल मधून उत्तीर्ण केली . वाशिम येथिल संमती लॉ कॉलेज मधून तिने एल एल बी ची परीक्षा14 फेब्रुवारी 2021 मध्ये उत्तीर्ण केली,वाशिम जिल्ह्यात गवळी समाजातून एल एल बी परीक्षा उत्तीर्ण होणारी ती पहिलीच महिला असावी तिने शिक्षण घेत असताना शेतात मजुरी करून शिक्षण घेतले .हलाखीची परिस्थितीअसताना तिने शिक्षण सुरु ठेवले .शिक्षणघेत असताना ती शेतात मजुरीचे काम करायची .मजुरी करीत असताना तिने शिक्षण घेतले एल एल बी चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने वकिलीचा सराव ज्येष्ठ वकीलासोबत सुरू केला आहे. तिच्या या कामाची दखल म्हणून तिचा सत्कार अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे गवळी समाजातील जिल्ह्यातील पहिली महिला वकील ऍड यास्मिन घासी रेघिवाले यांचा सत्कार त्यांच्या निवासस्थानी करण्यात आला.त्यांचा सत्कार समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष प्रा अरविंद गाभणे यांनी केला .यावेळी समता परिषदेचे जिल्ह्य सचिव विठ्ठल भागवत ,जिल्ह्य उपाध्यक्ष सेवाराम आडे,तालुकाअध्यक्ष गोरखनाथ भागवत ,मेडशी शाखा अध्यक्ष जावेद भवाणीवाले,ऍड यास्मिन घासी रेघीवाले तिचे वडील घासी छट्टू रेघीवाले,आई लचंछमी घासी रेघिवाले,आजोबा भिका घासी रेघिवाले,
आजी जम्मंन भिका रेघिवाले,काकाभिका छट्टू रेघिवाले,सलिम भिका रेघिवाले,मन्नान छट्टू रेघिवाले,रमजान गौरे माजी सरपंच मेडशी,धन्नू भवानीवाले,मोहना भवाणीवाले,संतोष तायडे,रहीम बागवान,इरफान रेघिवाले,मोसिन भवाणीवाले,इरफान भवानीवाले,सोहेल रेघिवाले,सुधाकर चोथमल,
आदी उपस्थित होते.


