वृषभ दरोडे
तालुका प्रतिनिधी राळेगाव
वडकी येथील स्मॉल वंडर कॉन्व्हेंट जवळील असलेल्या रस्त्याचा भूमिपूजन सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडला.गेल्या अनेक वर्षांपासून वडकी येथील स्मॉल वंडर कॉन्व्हेंट जवळील असलेल्या रस्त्याची अत्यंत वाईट दुर्दशा होती,चिमुकल्या विद्यार्थ्यांना कॉन्व्हेंट मध्ये जायला आपली वाट चिखलातून काढावी लागत होती ही बाब वडकी वाढोना गटाच्या जी,प सदश्या सौ प्रीतिताई काकडे यांना माहिती होताच त्यांनी या रस्त्याबाबत पाठपुरावा करून जिल्हा परिषद जनसुविधेमधून हा रोड मंजूर केला आणि या रस्त्याचे आज मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले ह्यावेळी भूमिपूजन सोहळ्याला जी,प सदश्य चित्तरंजनदादा कोल्हे,पं, स,सभापती प्रशांत तायडे,जी,प सदश्या सौ प्रीतिताई काकडे,गावच्या सरपंच सौ मोनिका देठे,उपसरपंच शैलेश बेलेकर,माजी सरपंच दिलीप कडू,जी,प शाखा अभियंता शिंगणे,अशोक कुमार,इंजिनियर ढोले साहेब,रवी चौधरी,विशाल पंढरपुरे,शारदानंद जैस्वाल,मारोती धोटे,रंजित ठाकरे,चाफले काका,अनिल नंदूरकर उपस्थित होते.