शरद वालसिंगे
ग्रामीण प्रतिनिधी अकोट
अकोट-“शेतकऱ्यांसाठी वरदान मशरूम (अळंबी) उत्पादन तंत्रज्ञान”
भारत कृषी क्षेत्रात अग्रेसर देश आहे. पण वातावरणात होणारे बदल शेतीला लागणारी लागत हे दिवसेंदिवस वाढत आहे. याला एक उत्तम पर्याय म्हणजे मशरूम (अळंबी) लागवड होय, कमी खर्चात आणि कमी जागेत येते व चांगले उत्पादन मिळते हे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संलग्न डॉ.राजेंद्र गोडे कृषि महाविद्यालय बुलडाणा येथील आठव्या सत्रातील विद्यार्थ्यांनी सिध्द करून दाखविले आहे.
पारंपारिक शेतीला एक चांगला जोडधंदा म्हणुन मशरूम नक्कीच बनू शकते. शेतकऱ्यांना उत्तम मार्गदर्शन मिळाले तर हे शक्य आहे याचे प्रत्यक्षीक डॉ.राजेंद्र गोडे कृषि महाविद्यालयामध्ये करून दाखविले. यामध्ये त्यांनी ऑईस्टर (प्लूरोटस फ्लोरिडा) या जातीचे मशरूम उत्पादन घेत असतांना निरजंतुकीकरना बाबतची सर्व काळजी घेऊन विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे उत्पादन घेतले.
याकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.यु. वाघ तसेच वनस्पती रोगशास्त्र विभागाचे प्रा. एम.पी. व्यवहारे यांचे मार्गदर्शन लाभले.