महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती दि.14:- नुकताच मुंबई येथे दि.26एप्रिल2022 रोज मंगळवारला सन 2019-20 या सत्रात वर्धा जिल्ह्यातील उच्च प्राथमिक शाळा बोथली(की) चा विद्यार्थी अक्षय डोळे याला भारत स्काऊट शासकीय राज्य पुरस्काराने राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते मा. सुनीलजी केदार क्रीडा मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली व मा. राज्यमंत्री अदिती तटकरे व इतर मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
आजपर्यंतच्या इतिहासात इतका मोठा पुरस्कार मिळविणारा जि.प.शाळेचा विद्यार्थी अक्षय डोळे हा प्रथम मानकरी ठरला या यशाबद्दल ग्रामपंचायत बोथली(की) व शाळा यावस्थापन समिती यांच्या सयूंक्त विद्यमाने मुंबईवरून परत येताच आज दि.28एप्रिल 2022 ला बोथली येथे अक्षयचे बँड
पथकासह मीरवणूकीनेशाळेत स्वागत केले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर पालथे, गावच्या सरपंचा वर्षा मधुकर चौकोने,उपसरपंच सतीश लांडगे व शिक्षण विभाग पंचायत समितीचे बिट विस्तार अधिकारी सतीश कास्टे, शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र गायकवाड यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन अक्षय आणि अक्षयचे वडील मनोहर डोळे यांचा सत्कार करण्यात आला या वेळी ग्रामपंचयात सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती व गावकरी उपस्थित होते.या प्रसंगी अक्षय सह मार्गदर्शक शिक्षक मारोती विरुळकर,मुख्याध्यापक राजेंद्र गायकवाड,भानुदास आजणकर,किशोर खिराळे,प्रमोद पिंजारे,रंजना बाभूळकर,स्मिता जवजवार यांचे भारत स्काऊट वर्धेच्या संघटिका वैशाली अवथळे, शिक्षणाधिकारी लिंबाजी सोनवणे, पंचायत समिती सभापती हनुमंत चरडे,पंचायत समिती सदस्य बाबाराव अवथळे,शिक्षण विभागचे गटशिक्षणाधिकारी सुरेश पारडे केंद्रप्रमुख अजय वनस्कर आणि समस्त ग्रामस्थानी अभिनंदन करून पुढील वाटचालीस
शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भानुदास अजनकर यांनी केले तर आभार किशोर खिराळे यांनी मानले.