के व्ही एस डान्स अकॅडमी भद्रावती चा उपक्रम
महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती दि १४: शहरातील के.वी.एस. डान्स अकॅडमी यांनी ५ वर्षे वयोगटापासून तर १६ वर्ष वयाच्या मुलांचा योग प्रशिक्षण वर्ग दिनांक ०७/०५/२०२२ श्री. गुरुदेव लॉन, भद्रावती येथे सकाळी ७ वाजता आयोजित केला होता.मागील अनेक वर्षापासून के.वी.एस. डान्स अकॅडमी भद्रावती शहरातील लहान मुले, तरुण आणि महिलांना डान्स प्रशिक्षण देण्याचे काम करत आहे. या वर्षीसुद्धा उन्हाळ्याच्या सुट्ट्या मध्ये लहान मुला-मुलींना डान्स सोबत योगा, विविध खेळ, कराटे यांचे प्रशिक्षण देत आहे.योग शिक्षण देण्याकरिता माननीय प्रकाश रामचंद्र आस्वले सर यांना प्राचारण करण्यात आले होते. के.वी.एस. डान्स अकॅडमी चे डान्स टिचर कुणाल गुलाब आत्राम सर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन प्रकाश आस्वले सरांचा सत्कार करण्यात आला. प्रकाश सरांनी उपस्थित सर्व मुला-मुलींना योग आणि प्राणायाम मुळे मानवी शरीरासाठी होणारे फायदे या विषयी मार्गदर्शन केले. योग प्रशिक्षण वर्गाला ५० पेक्षा जास्त लहान मुला-मुलींनी सहभाग नोंदविला होता.प्रकाश सरांनी प्राणायम वर्गामध्ये भस्त्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम यांचे प्रात्यक्षिकातून माहिती दिली. तसेच वक्रासन, गोमुखासन, शशकासन हे सर्व आसन उपस्थित मुलांना शिकविण्यात आले. सोबत सुक्ष्म व्यायामामध्ये सायकलिंग, हाताचे व खांद्याचे व्यायाम घेण्यात आले.योग प्रशिक्षण वर्ग या करिता के.वी.एस. डान्स अकॅडमी भद्रावती चे डान्स टीचर कुणाल गुलाब आत्राम आणि कार्तिक नागोसे यांनी खूप मेहनत घेतली.