शरद वालसिंगे
ग्रामीण प्रतिनिधी अकोट
जितापूर माऊली गावामध्ये बालसंसकर शिबिर आयोजित करण्यात आले आहे .शिबिरामध्ये गावातील सर्व बाल गोपाळ सहभागी झाले आहेत.शिबिरामध्ये विद्यर्थ्यनी संस्कृत भाषेतील श्लोक तसेच भगवत गीता इ गोष्टी शिकविल्या जात आहेत.तसेच गावातील मंडळी कडून सकाळ संध्याकाळ पंगत दिली जात आहे.आज शिबिर ला श्री ह भ प संजय महाराज पाचपोर तसेच श्री वासुदेव महाराज महल्ले श्री क्षेत्र श्रद्धासागर यांनी भेट देऊन गावात सुरु असलेल्या शिबिराचे कौतुक केले.शिबिरामध्ये श्री ह भ प दिनेश महाराज मंगळे तसेच श्री ह भ प साबळे महाराज विद्यर्थ्यनी शिकवण्याचे काम करत आहेत.गावामध्ये सुरु असलेल्या शिबिराची पंचक्रोशीत स्तुती होत आहे.
शिबिरासाठी गावातील सर्व तरुण तसेच पुरुष मंडळींचे सहकार्य लाभत आहे.