विकास ठाकरे
तालुका प्रतिनिधी अकोला.
अकोला: सम्राट अशोक पर्व महोत्सव २०२२ यांच्या वतीने देवळी येथील सरपंच सौ. वैशालीताई विकास सदांशिव यांना यंदाचा “प्रबुद्ध पुरस्कार” देवून सन्मानित करण्यात आले.
ग्रामपंचायत देवळी येथील सरपंच तथा वंचित बहुजन आघाडीच्या महिला पदाधिकारी सौ. वैशालीताई विकास सदांशिव यांनी अकोला तालुक्यातील देवळी या गावात गाव विकासाचे व समाज प्रबोधनाचे सोबतच सामाजिक एकतेची अनेक उल्लेखनीय कार्य केले आहेत. या कार्याची दखल घेत सौ. वैशाली विकास सदांशिव यांना अकोला पंचायत समितीच्या १५ वा वित्त आयोगाच्या नियोजन समितीवर घेण्यात आले आहे सोबत छोट्या मोठ्या संस्था व विविध संघटनेच्या वतीने त्यांना आतापर्यंत जवळपास २३ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. नुकत्याच रमाई मोहोत्सवात वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष मा. दिशा पिंकी शेख (अम्मा) यांच्या हस्ते रमाई पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अनेक समाजरत्न व समाजभुषण पुरस्कारांनी सौ. वैशाली विकास सदांशिव यांना मान्यवरांच्या हस्ते आदर्श सरपंच देण्यात आले आहेत. त्यांच्या याच कार्याची दखल घेवून सम्राट अशोक पर्व महोत्सव २०२२ या कार्यक्रमात सरपंच सौ वैशालीताई विकास सदांशिव यांना प्रबुद्ध पुरस्कार २०२२ ने स्थानिक आबासाहेब खेडकर सभागृह अकोला येथे हजारो लोकांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.