विकास ठाकरे
तालुका प्रतिनिधी अकोला.
अकोला : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महा ज्योती ) नागपुर या संस्थेच्या वतीने, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिना निमित्त, लोक जागृती संस्था चंद्रपुर प्रस्तुत, महात्मा ज्योतिबा फुले लिखित, अनिरुद्ध वनकर दिग्दर्शित, “तृतीय रत्न” या नाटकाचा प्रयोग अकोल्याच्या प्रमिलाताई ओक हॉल मध्ये मंगळवार दिनांक 17 मे 2022 रोजी सायंकाळी 7 वाजता आयोजित केला आहे. ह्या नाट्य प्रयोगाला “मोफत प्रवेश” असून याचा जास्तीत जास्त रसिकांनी लाभ घ्यावा अशी विनंती महाज्योती चे संचालक प्रा. दिवाकर गमे, महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. तुकाराम बिडकर तथा विभागीय संघटक गजानन इंगळे, जिल्हाध्यक्ष प्रा. सदाशिव शेळके, महानगराध्यक्ष श्रीराम पालकर, कार्याध्यक्ष उमेश मसने, गजानन म्हैसने, विजय उजवणे, महिला आघाडी अध्यक्षा माया ईरतकार, ज्योती भवाने, कु. कल्पना गवारगुरू, दीपमाला खाडे यांनी केले आहे.