महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती,दि.१५:-दिवसेंदिवस दिवस वाघांच्या हल्ल्यात ठार होण्याच्या घटनांची संख्या वाढत असतानाच ताडोबा बफर झोनमध्ये सितारामपेठ परिसरात वाघाने हल्ला करून एका महिलेला ठार केल्याची घटना दि.१४ मे रोजी सकाळी घडली. जाईबाई महादेव जेंगठे (६५) रा. मोहुर्ली असे मृतक महिलेचे नाव आहे. घटनेच्या दिवशी ती तेंदू पत्ता तोडण्यासाठी सदर जंगल परिसरात गेली होती. तेंदू पत्ता तोडत असतानाच दबा धरून बसलेल्या वाघाने तिच्यावर हल्ला चढविला. त्यात ती जागीच ठार झाली. या घटनेने ग्रामस्थ भयभित झाले असून जंगल परिसरातील नागरिकांनी कसे जीवन जगायचे असा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला आहे.