गोकुळ हिंगणकार
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा तालुक्यातील चारही भागाच्या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असल्याने विशाल नांदोकार या युवकाने कामे सुरु करण्याबाबत आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे या मागण्या त्वरित मान्य करणेबाबत तहसीलदार तेल्हारा यांना नागरिकांच्या वतीने निवेदन देण्यात आले असून तालुक्यातील रस्त्यांची कामे विनाविलंब मार्गी न लावल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नागरिकांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून केला असून 29 जून मंगळवारला संपूर्ण तेल्हारा तालुका बंद चे आवाहन करण्यात आले आहे.
तालुक्यातील मुख्य रस्त्यांची दैनीय अवस्था झाली असून या रस्त्यामुळे अनेक लहान मोठे अपघात झाले अनेकांना अपंगत्व आले तर अनेकांना आपला जीव गमवावा लागला या रस्त्यांसाठी नागरिकांनी वेगवेगळ्या माध्यमातून अनेक आंदोलने केलीत पण कुंभकर्णी झोपेत असलेल्या शासनाला जाग आली नाही अखेर शहरातील युवक विशाल महादेवराव नांदोकार हे आमरण उपोषणाला बसले त्यांच्या मागण्यांना व त्या अनुसरून केलेल्या उपोषणाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला आहे. यावेळी निवेदनाच्या प्रती ना .बच्चु कडू पालकमंत्री अकोला, खासदार संजय धोत्रे ,आमदार प्रकाश भारसाकळे, जिल्हाधिकारी अकोला अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला, उपविभागीय कार्यालय शाखा अभियंता ,पोलीस स्टेशन तेल्हारा हिवरखेड यांना निवेदनाच्या प्रती दिल्या आहेत यावेळी तेल्हारा शहरासह तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थि होते
साप्ताहिक आंदोलनाची ठरली दिशा
1) दिनांक 29 जून मंगळवारला संपूर्ण तेल्हारा तालुका बंद
2 ) 30 जूनला सार्वजनिक बांधकाम उपविभागिय कार्यालयाला( तेल्हारा)घेराव
3 ) 1 जुलैला रास्ता रोको आंदोलन 4) 2 जुलैला लोकप्रतिनिधी यांच्या घरासमोर आंदोलन व सार्वजनिक बांधकाम कार्यालय अकोला येथे हे आंदोलन अशाप्रकारे सात दिवस आंदोलन करण्याचा इशारा निवेदनामध्ये नागरिकांनी दिला आहे व या आंदोलनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास याला संपूर्णपणे शासन जबाबदार राहील असे सुद्धा निवेदनात म्हटले आहे
उपोषण स्थळी कार्यकारी अभियंता सरनाईक यांनी दिली भेट
तेल्हारा तालुक्यातील महत्त्वाचे रस्ते मंजूर झाले आहेत सदर रस्त्यांची कामे ही काही कारणाने बंद झाली होती सध्या स्थितीत सदर कंत्राटदाराने या रस्त्याचे पावसाळ्यात वाहतूक वर्दळ सुस्थितीत सुरू करण्याच्या दृष्टीने देखभाल दुरुस्तीचे काम सुरू केले असून मूळ काम 10 जुलै पासून सुरू करण्यात येईल व साधारण पंधरा महिन्यापर्यंत काम पूर्ण करण्यात चे नियोजन आहे तरी आपण सोडावे असे पी .आर. सरनाईक कार्यकारी अभियंता जागतिक बँक प्रकल्प विभाग अकोला यांनी उपोषण स्थळी भेट देवून विशाल नांदोकार यांनी उपोषण सोड़ावे असे लेखी स्वरुपात पत्र दिले या वेळी त्यांच्या सोबत तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर , ठाणेदार नितिन देशमुख , उपविभागीय अभियंता बोचे आदि उपस्थित होते