मोटेगाव जवळील मांगली रिठ शेतशिवरातील घटना
विकास खोब्रागडे
जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर
चंद्रपुर/ चिमूर तालुक्यातील नेरी वरून जवळ असलेल्या मोटेगाव जवळील मांगली रिट शेतशिवारातील शेतांमध्येदिनांक २६ जुन २०२१ रोजी हरणी येथील शेतकरी शामरावजी डोमाजी नन्नावरे वय65 वर्षे हे शेतात काम करत असतांना सांयकाळी ५ते ६ च्या सुमारास दबा धरून असलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला त्यात त्यांचा जागीच मृत्यु झाला. पावसाळ्याला सुरवात झाली शेतीच्या हंगामालाजोमात सुरवात झाली शेतकरीवर्ग शेती कामात व्यस्त झाले आहेत अश्यातच काल हरणी येथील शेतकरी शामरावजी ननावरे हे शेतात काम करीत असताना शेतालगत दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक शमरावजी वर हल्ला केला या हल्ल्यात ते जागीच गतप्राण झाले सदर घटनेची माहिती इतर शेतकऱ्यांना होताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली तर वाघ पसार झाला लगेच घटनेची माहिती वनविभागाला आणी पोलीसना कळविताच संपूर्ण ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले वनविभागाचे नेरी बिटाचेक्षेत्र साहाययक खोब्रागडे वनरक्षक नागरे ,सोनुने यांनी मुत पार्थिवाचे पंचनामा करुण शव शविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय चिमुर येथे पाठवीन्यात आले.सदर घटनास्थळ हे तळोधी वनपरिक्षेत्र अंतर्गत नेरी बीटात येते मोटेगाव परिसरात नेहमीच वाघाची दहशत असून वाघाचा वावर आहे या परिसरातील अनेक पाळीव प्राण्यावर वाघाने डल्ला मारला असून याच जंगल परिसरात तो वास्तव्यास असतो मागील एक महिन्यांपूर्वी पेंढरी येथील महिलेला वाघाने ठार केले होते मोटेगाव येथे नेहमीच गावात आणि परिसरात वाघाचे दर्शन नागरिकांना होत असते त्यामुळे वनविभागा प्रति नागरिकांत असंतोष निर्माण झाला आहे हल्ल्यात ठार झालेल्या शेतकऱ्यांच्या मागे पत्नी दोन मुली आणि एक मुलगा असा बराच मोटा परिवार आहे त्यामुळे वनविभागाने तात्काळ नुकसानभरपाई देऊन कुटूंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत घ्यावे अशी मागणी जनतेकडून होत आहे सदर वाघाच्या हल्यात एका शेेतकऱ्याचा जिव गेला त्यामुळे शेतकऱ्यांनमध्ये भितीचे वातावरन निर्माण झाले आहे सदर वाघाचे बंदोबस्त करावे अशी मागणी परिसरातील शेतकरी व जनता करीत आहे