किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या माझोड येथील घटना
कबाड कष्ट करून , तळहातावर मुला प्रमाणे जपलेल्या दहा महिन्याची केळीची झाडे, क्षणात जमीन दोस्त
अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांचे नुकसान
शासकीय मदतीची अपेक्षा
अकोला तालुका
गत दहा वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे अवेळी व अपुरा पाऊस झाल्याने सततची नापिकीमुळे शेतकरी कमालीचा धास्तावलेल्या अवस्थेत असल्याचे अकोला तालुक्यातील चित्र असताना यंदा मात्र पाऊस बऱ्यापैकी होईल या आशेवर शेतकरी असतांनाच मृग नक्षत्रात पावसाने हजेरी लावली होती तर गत विस दिवसा पासून दीर्घ विश्रांतीनंतर रविवारी 27 जुन रोजी तालुक्यातील काही भागात मान्सून सक्रिय होऊन पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली दरम्यान याच वादळामुळे अकोला तालुक्यातील माझोड येथील पांडुरंग नारायण बंड यांच्या शेतातील दहा महिन्याचे जुलै महिन्यात हाती येणारे केळीची पाऊन एकर बाग क्षणात वादळी वाऱ्यासह पावसाने जमीन दोस्त झाल्याने सदर शेतकरी आर्थिकदृष्ट्या हतबल सह अस्मानी संकटात सापडल्याचे चित्र आहे दरम्यान शासनाने सादर झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून आर्थिक मदत करावी अशी नुकसानग्रस्त शेतकर्यांची मागणी आहे,
पांडुरंग बंड हे प्रयोगशिल शेतकरी असुन त्यांनी आपल्या शेतात आज पर्यंत कापूस, सोयाबीन आदी पिके घेतली, परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे अवेळी पाऊस,बोंड अळी,व इतर पिकावरील रोग या मुळे लागवड सह इतर खर्चाच्या तुलनेत नापिकी झाल्याने त्यांनी कापूस सोयाबीन या पिकांना फाटा देऊन दहा महिन्या अगोदर आपल्या शेतात एक हजार केळी लागवड केली, दरम्यान मशागत,सह गत दहा महिन्यांपासून पोटच्या पोराला तळहातावर जपावे तसे आपल्या शेतातील केळीची जपवणूक केली, दरम्यान केळीचे उत्पादन बर्या पैकी होईल या आशेवर असताना रविवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने सदर शेतातील किमान सातशे ते आठशे केळीची झाडे जमीन दोस्त झाली, व सदर शेतकरी अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांचे किमान चार ते पाच लाख रुपयांचे उत्पन्न नुकसान झाले दरम्यान संबंधित विभागाने दखल घेऊन शासनाने आर्थिक मदत करावी अशी नुकसानग्रस्त शेतकर्यांची मागणी आहे
निवासी उपजिल्हाधिकारी संजयजी खडसे यांनी घेतली दखल
दरम्यान सदर शेतकरी पांडुरंग बंड यांनी अकोला निवासी उपजिल्हाधिकारी संजयजी खडसे यांना माहिती दिली, दरम्यान माहिती मिळताच सदर शेतकऱ्यांचे केळीचे झालेले नुकसान समजून संबंधितांना पंचनामा करण्याचे आदेश दिले व सदर शेतकऱ्याची सहानुभूती केली









