अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पातुर तालुक्याचे वतीने 4 जुलै रोजी दुपारी 1 वाजता पातूर येथील राधाकृष्ण मंगल कार्यालय सभागृहामध्ये पत्रकारांच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये जिवाची पर्वा न करता अधिकारी-कर्मचारी पत्रकार यांनी कार्य करून या काळात महत्त्वाचे योगदान केले आहे.
अशा कर्तव्यदक्ष कोरोना योद्धा यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे यासोबतच पत्रकारांना हेल्मेट ओळख पत्र सन्मानचिन्ह देण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमाचे उद्घाटन श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली अकोला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते उद्घाटन होत असून या कार्यक्रमाकरिता पालकमंत्री नामदार बच्चुभाऊ कडू ,आमदार रणधीर सावरकर, आमदार नितीन देशमुख, आमदार गोपीकिशन बाजोरिया, अकोला पोलीस अधीक्षक जी. श्रीधर मराठी पत्रकार संघाचे प्रदेश सचिव विश्वासराव आरोटे,विदर्भ प्र. बाळासाहेब देशमुख, प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव, विदर्भ अध्यक्ष संदीप पांडव, जिल्हाध्यक्ष गणेश सुरजुसे , उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी, उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय आव्हाड , तहसीलदार दिपक बाजड, वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके, ठाणेदार हरीश गवळी, पातुर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सोनाली यादव, सभापती सौ रुपाली गवई, प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे, विदर्भ उपाध्यक्ष श्रीकांत पाचकवडे अमरावती विभागीय सिद्धार्थ तायडे, विभागीय मुख्य अभियंता विठ्ठल खटारे औद्योगिक विद्युत केंद्र पारस ,उपविभागीय अधिकारी संतोष खुमकर , शाहबाबू एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी अधिकारी इसहाक राही सर , तुळसाबाई कावल विद्यालय चे माजी प्राचार्य विजयसिंह गहिलोत, प्रमुख मार्गदर्शक तसेच प्रदेश सल्लागार दैनिक देशोन्नती चे मुख्य संपादक शेतकरी नेते प्रकाश भाऊ पोहरे, माजी जिल्हाध्यक्ष बार असोसिएशन चे एड. प्रकाश वखरे ,ज्येष्ठ पत्रकार शंकरराव नाभरे,राजाराम देवकर, प्रदीप देशमुख, प्रा.सि. पि. शेकूवाले,अब्दुल कदीर तसेच संयोजक डॉ. सुभाष लहाने जिल्हाध्यक्ष बुलढाणा ,नवीन मुंडे जिल्हाध्यक्ष अमरावती, सुनील फुलारी जिल्हाध्यक्ष वाशिम, उदय नवाडे, जिल्हाध्यक्ष यवतमाळ , पवन वानखडे जिल्हा महासचिव अकोला, स्वाती सुरजुसे जिल्हा संघटक अकोला ,अमित शहराध्यक्ष अकोला, प्रदीप गावंडे तालुका अध्यक्ष बार्शिटाकळी, राहुल कुलट तालुका अध्यक्ष अकोट, विष्णू वैराळे कार्याध्यक्ष बाळापुर आदी उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन पातुर तालुका अध्यक्ष देवानंद गहिले तालुका सचिव प्रा.सि. पि.शेकूवाले, तालुका कार्याध्यक्ष संजय गोतरकर तालुका उपाध्यक्ष श्रीधर लाड तालुका सहसचिव राजारामजी देवकर ,तालुका संपर्क प्रमुख नासिर शेख ,तालुका संघटक सुनील गाडगे,सहसंघटक रामहरी पल्हाड, कोषाध्यक्ष अजय शिंदे, प्रसिद्धी प्रमुख अविनाश पोहरे, प्रेस फोटोग्राफर सतीश कांबळे, मोहम्मद फरहान अमीन,नातीक शेख,नय्यर खान उर्फ़ गुड्डू भाऊ, सुधाकर राऊत, राजेश कीर्तने ,शैलेश जगदाळे , प्रा. साजिद सर, राहुल सोनोने, रमेश निलखन, अब्दुल जफर , योगेश नागलकर ,राहुल देशमुख, पंकज भाकरे, प्रेमचंदशर्मा,मंगेश फाळके, अमोल देवकते, गोपाल कोळसे, रक्षण देशमुख ,दिलीप गिर्हे,अब्दुल जफर ,प्रशांत गवई, श्रीकृष्णा लखाडे, विजय सरदार, बाबुराव सावंत आदींनी केले आहे










