अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगांव
मालेगाव व जिल्हात ही ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण घालवणाऱ्या आघाडी सरकारच्या कारभारा विरोधात भारतीय जनता पार्टीतर्फे दि 26 जून रोजी मालेगावात चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे , जोपर्यंत ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही तो पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घेऊ नयेत अशी मागणीही त्यांनी केली . भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ . पाटणी यांनी सांगितले की , महाराष्ट्र राज्य सरकारने ठोस पाऊल उचलले असते , तर ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण गमाविण्याची वेळच आली नसती . ना . देवेंद्र फडणवीस सरकारने तातडीने
हालचाली केल्यामुळेच त्यावेळी हे आरक्षण वाचले . मात्र त्या नंतर आघाडी सरकारने आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही वेळेत पूर्ण केली नाही .आघाडी सरकारमधील मंत्री आरक्षणाच्या मुद्द्याचा निकाल लागेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही अशी वक्तव्ये करतात . मात्र राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जाहीर केल्या तरी आघाडी सरकारमधील मंत्री गप्प आहेत . सुप्रीम कोर्टाचा निकाल येऊन दोन महिने लोटले तरी सरकारने ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण परत मिळवून देण्यासाठी काही हालचाली केल्या नाहीत.राज्य सरकारच्या निष्क्रियतेमुळेच राज्य निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करण्यात महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण समुष्टात आले आहे . ओबीसी समाजावर हा मोठा अन्याय आहे.सदर अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व ओबीसी समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण परत मिळवून देण्यासाठी भाजपा जिल्हाभरात करीत असलेल्या चक्काजाम आंदोलनात जिल्हा परिषद श्याम बडे सह पदाधिकारी , कार्यकर्ते व लोकप्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणात उपस्थीत होते.