अवैध दारू सह 3 लाख 80 हजार चा मुद्देमाल जप्त
महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती दि. २७:-भद्रावती पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाला मुखबीरकडुन मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारेअवैध रित्या दारू वाहतूक करणाऱ्या आरोपीला रंगे हात पकडून भद्रावती पोलिसांनी कडून कारवाई करण्यात आली.
सदर एक अॅटो क एम एच ३४ डी ६७६५ तेलवासा घाटावरून भद्रावती मार्गे चंद्रपुरकडे अवैधरित्या देशी दारूची वाहतुक करणार आहे. अशा खबरेवरून मौजा तेलवासा येथे रात्री ११.०० ते १२.०० वा दरम्यान नाकाबंदी करून अॅटो चालकास त्याचे नांव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नावं १. दिवाकर दिलीप बावने, वय ३० वर्षे रा मेजर गेट, चंद्रपुर २ आशिष कैलास राउत, वय २२ वर्षे, रा मेजर गेट, चंद्रपुर ३. शहबाज सादीक शेख, वय १९ वर्षे, रा दिपक चौक, वणी असे सांगीतले वरून अॅटो क एम एच ३४ डी ६७६५ ची पंचासमक्ष प्रो व्ही बाबत झडती घेतली असता त्यात मागील सिटवर १३ चुंगळ्यात प्रत्येकी ९० एम. एल. मापाच्या रॉकेट संत्रा देशी दारूने भरलेल्या सिलबंद १३०० निपा कि. अं. १,३०,०००रू, मॅकडॉल न १ चे २ ली चे ६ बंपर कि अ १८,०००रू, मॅकडॉल नं १ च्या प्रत्येकी १८० एम एल मापाच्या ४० सिलबंद निपा कि अ १२०००रू, आरोपीचे २ मोबाईल कि अ २०,०००रू, व व वाहतुकीकरीता वापरलेले अॅटो क्र एम एच ३४ डी ६७६५ कि अ २,००,०००रू असा एकण ३,८०,००० रू चा माल जप्त केला. तसेच दिनांक २५जून ला रात्री १०:४० ते ११:३० वाजता च्या दरम्यान नागमंदीर जवळ एक ट्रॅक्टर क एम एच ३२ पी ११७७ हा अवैध रित्या रेतीची वाहतुक करीत असतांना मिळुन आल्याने ट्रॅक्टर मालक श्रीकृष्ण गणपत जिवतोडे, वय ३८ वर्षे, रा गवराळा व चालक विलास अरूण भास्कर, वय २९ वर्षे, रा गवराळा यांचेविध्द कारवाई करण्यात आली असुन त्याचेकडुन गुन्हयात ट्रॅक्टर, ट्रॉली व १ ब्रास रेती असा एकणु ६,५५,००० रु चा मालजप्त करण्यात आलेला आहे. सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक अरविंद साळवे सा, अपर पोलीस अधिक्षक अतुल कुळकर्णी सा., उप वि. पोलीस अधिकारी निलेश पांडे सा, यांचे मार्गदर्शनात पो. नि. सुनीलसिंग पवार, गुन्हे शोध पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षकअमोल तुळजेवार पोशि केशव चिटगिरे, हेमराज प्रधान, शशांक बदामवार यांनी केली.