सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली/अहेरी:- आगामी होणारी 416 पदांची गडचिरोली पोलीस दल भरतीची तयारी करण्यासाठी अहेरी येथे स्पार्टन अकॅडमी मार्फत शारीरिक क्षमता चाचणी मार्गदर्शन आणि चाणक्य अकॅडमी मार्फत लेखी चाचणी मार्गदर्शन वर्ग सुरू झालेली असून यात पोलीस भरती ची तयारी करणारी तब्बल 120 विद्यार्थांचा सहभाग आहे.सदर मार्गदर्शन फी स्वरूपात असली तरीही गरीब,गरजू, नक्षलपीडित व नक्षली भागातील विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन देण्यात येत आहे.दररोज चेरपल्ली नाला येथे मेजर मुन्ना हे विद्यार्थ्यांना शारीरिक क्षमता चाचणी मार्गदर्शन करत असून दररोज चाणक्य अकॅडमी अहेरी व आलापल्ली येथे जुगल बोमनवार यांचा मार्फत पोलीस भरती लेखी चाचणी व इतर स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन देण्यात येत आहे.तसेच सदर गडचिरोली पोलीस भरतीत आपल्याच भागातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना यश मिळावे म्हणून एस.बी.काॅलेज अहेरी येथील पटांगणात दर शुक्रवारला शारीरिक क्षमता चाचणी तर दर रविवारला लेखी चाचणी घेऊन परीक्षेची सराव देखील करवुन घेतली जात आहे.यात भामरागड,सिरोंचा,एटापल्ली,मुलचेरा व अहेरी तालुक्यातील विद्यार्थी मार्गदर्शन घेत असून गरीब व नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना कोणतीही फी नसून सदर मार्गदर्शनाचा फायदा घ्यावा.असे मार्गदर्शक मेजर मुन्ना आणि जुगल बोमनवार यांनी केले.











