सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली/लाहेरी:- सीआरपीएफ व नेहरू युवा केंद्रा चा संयुक्त सामाजिक उपक्रमाद्वारे आदिवासी आणि नक्षल प्रभावित गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना 13 वी आदिवासी युवक आदान-प्रदान कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे.त्या नुसार 37 बटालियन कार्यक्षेत्र भामरागड तालुक्यातील लाहेरी भागातील दुर्गम आणि नक्षलग्रस्त आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना जम्मू आणि कश्मीर यात्रेकरिता पाठवण्यात आले आहे.आदिवासी समाज आणि नक्षल प्रभावित क्षेत्रातील युवकांना देशाची कला-संस्कृती विविध क्षेत्रांची माहिती बोलीभाषेचे ज्ञान नाही म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वाढ होण्याच्या उद्देशाने सीआरपीएफ आणि नेहरू युवा केंद्राचे सहयोगाने तेरावी आदिवासी युवक आधार प्रधान कार्यक्रमाच्या अंतर्गत भामरागड तालुक्यातील लाहेरी परिसरातील अकरा मुला-मुलींना या योजनेचा लाभ देण्यात आले आहे.त्यामुळे ते आपल्या भविष्याला उज्वल बोलू शकतात आणि आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करू शकतात व प्रोत्साहित होऊन नक्षल प्रभावित क्षेत्रातील बाकी युवकांना चांगला मार्ग स्वीकारून आपल्या समाजाच्या आणि देशाच्या विकासासाठी मदत करू शकता.यावेळी सीआरपीएफचे असिस्टंट कमांडंट संतोष भोसले, पोलीस निरीक्षक शीतला प्रसाद, द्विवेदी,लाहेरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी महादेव भालेराव,पोलीस उपनिरीक्षक प्रशांत डगवार,संतोष काजळे,सिआरपीएफचे सर्व जवान व लाहेरी पोस्टेचे अंमलदार उपस्थित होते.सदर दरम्यान असिस्टंट कमांडंट भोसले यांनी विद्यार्थ्यांना सदर यात्रेचा लाभ घेण्यास सांगून नक्षलग्रस्त व अतिदुर्गम भागात विद्यार्थ्यांनी पुढे येऊन विकासात भागीदार होण्यासाठी प्रोत्साहित केले.तसेच सर्व विद्यार्थ्यांना यात्रेसाठी शुभेच्छा देऊन हिरवा झेंडा दाखवून यात्रेची सुरुवात केली.हा उपक्रम 37 बटालियन सीआरपीएफचे कमांडंन्ट एम.एच. खोब्रागडे,मनमदन कृष्ण यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.











