सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली/मुलचेरा:- मुलचेरा तालुक्यातील अडपल्ली(माल) ग्रामपंचायतीच्या वतीने दिव्यांगांना 5 टक्के दिव्यांग निधीचे वाटप करण्यात आले.यावेळी सरपंच रेखा प्रकाश कन्नाके,उपसरपंच महेंद्र दौलतराव आत्राम,ग्रा.प.सदस्य संदिप चौधरी,विजू मांदाडे,ग्रामविकास अधिकारी आय.एम.बारसागडे आदी मान्यवर उपस्थित होते.ग्रामपंचायतीच्या वतीने 5 टक्के दिव्यांग निधीतुन 19 दिव्यांगांना सिलींग फॅनचे मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले.त्यामधे आयूष कावळे,सदानंद तोगट्टीवार,निर्भय नेवारे,प्रशिक मेश्राम,श्रेयश उराडे,बादल वनकर, सिध्दार्थ चांदेकर,नितेश चांदेकर,जानकिराम निमरड,समीक्षा चौधरी,पुजा चल्लेवार,रुषिश्वर गलबले,हर्षल आलाम,नंदिनी अलोणे,माया पातर,कुंदा टेकाम,शंकर गेडाम,सुरेंद्र उपासे, सुभाष निमसरकार आदिंचा समावेश आहे.सदर दिव्यांगांना ग्रा प.च्या 5 टक्के दिव्याग निधितून सिंलीग फॅन दिल्या बद्दल ग्रामपंचायतीचे सरपंच, पदाधिकारी व ग्रामविकास अधिकारी यांचे दिव्यांगानी आभार व्यक्त केले आहे.