महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती दि. २८:- भोई गौरव मासिकाच्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक २७/०३/२०२२ रोज रविवार ला दुपारी १२ वाजत लोकमान्य टिळक भवन नागपूर येथील घेण्यात आलेल्या कार्यक्रमात नंदू पढाल भद्रावती नगरसेवक तथा शिवसेना शहर प्रमुख यांच्या कोरोना काळातील गरजूंना मदत, रुग्णांना आरोग्य मदत, गरिबांना अन्न धान्य वाटप, आणि सतत मागील पंधरा वर्षापासून जनतेच्या सेवेत असणाऱ्या समाजकार्याची तसेच तीनदा नगरसेवक म्हणून निवडून येण्याच्या व चंद्रपूर जिल्हा नियोजन समितीवर सदस्य म्हणून नियुक्त होण्याच्या राजकीय कार्याची दखल घेत यांना महाराष्ट्र भोई समाज रत्न सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अलौकिक कार्याबद्दल सन्मानपत्र देऊन या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. चंद्रलाल जी मेश्राम निवृत्त न्यायाधीश तथा महाराष्ट्र ओबीसी आयोगाचे सदस्य, प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानेश वाकुडकर सुप्रसिद्ध कवी, चंद्रकांत जी लोणारे संपादक भोई गौरव मासिक, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे समाज बांधव उपस्थित होते या कार्यक्रमात सामाजिक, राजकीय, औद्योगिक, क्रीडा, साहित्यिक, गायन, चित्रकला अशा विविध क्षेत्रात काम करून प्रावीण्य प्राप्त आणि समाजोपयोगी कार्य करणाऱ्या समाजबांधवांचा पुरस्कार व गौरव चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्याने त्यांच्यावर संपूर्ण महाराष्ट्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.