महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती,दि.२८:-धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी लवकरात लवकर बोनस जाहीर करण्यात यावा या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी, भद्रावती तर्फे दि.२५ मार्च रोजी येथील तहसील कार्यालया समोर आंदोलन करण्यात आले.राज्य शासनाने यावर्षी धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी अद्यापही बोनस घोषीत केलेला नाही. त्यामुळे चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या धान उत्पादक जिल्ह्यांमधील शेतकरी आर्थिक अडचणींचा सामना करीत आहे. करीता, धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी लवकरात लवकर बोनस जाहीर करण्यात यावा, ही मागणी घेऊन आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी भाजपा कार्यकर्ते नरेंद्र जीवतोडे, अर्चनाताई जीवतोडे, प्रवीण सातपुते, किशोर गोवारदीपे, विजय वानखेडे, अमित गुंडावार, इम्रान खान, सुनील नमोजवर, संतोष नागपुरे, बाबू राय, संजय वासेकर, सुनील खारकर, निशांत देवगडे, सोमेश्वर आत्राम, अजय बल्की, गोविंदा बिंजवे, सुनील बोरकुटे, माधव बांगडे, चटपल्लीवर, चेतन स्वान, विशाल ठेंगणे, नाना हजारे, विकास सुकारे, प्रशांत कोपूला, तोशीब शेख, अनिल ढेंगळे व भाजपा, भाजयुमो, महिला आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.