विकास ठाकरे
तालुका प्रतिनिधी अकोला
अकोला : स्नेहलता मतीमंद बहुद्देशीय संस्था अकोला व वंचित बहुजन महिला आघाडी अकोला महानगर यांच्या वतीने जि. प. अध्यक्ष यांच्या निवासस्थानी मंतीमंद मुले व त्यांच्या पालकांच्या सोबत रंगोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर महिला प्रदेश महासचिव सौ. अरूंधतीताई शिरसाट, वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, माजी जि. प. अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य सौ. पुष्पाताई इंगळे, माजी. जिल्हा परिषद सदस्य प्रतिभाताई अवचार, माजी जि. प. सदस्य सौ. सरलाताई मेश्राम, शहर अध्यक्ष शंकरराव इंगळे, माजी गटनेते गजानन गवई, सह जिल्हा प्रसिध्दी प्रमुख विकास सदांशिव, जिल्हा उपाध्यक्ष गजानन दांडगे, महासचिव मनोहर बनसोड, गजानन तायडे तर सेहालय मतीमंद बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सौ. रेणुकाताई तायडे, कोषाध्यक्ष सौ. ज्योतीताई अंभोरे, सचिव सौ. कमलताई बनकर, सदस्य निताताई डेरे, सहसचिव सौ. दिपालीताई शिरसाट ह्या उपस्थित होत्या या रंगोत्सव कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी महानगर महिला आघाडी अध्यक्षा सौ. वंदनाताई वासनिक ह्या होत्या तर हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी महानगर महिला महासचिव प्रा. मंतोषताई मोहोळ व संस्थेच्या अध्यक्षा सौ. रेणुकाताई तायडे यांनी पुढाकार घेतला होता. या रंगोत्सव कार्यक्रमात डॉ धैर्यवर्धन पुंडकर यांनी आपले मौलीक विचार व्यक्त करताना वंचित बहुजन आघाडी व श्रध्देय अॅड बाळासाहेब आंबेडकर हे जो कुणी वंचित असेल त्याच्या पाठीशी उभे राहिले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील मतीमंद मुलांच्या व त्यांच्या पालकांच्या समस्येच्या निवारणासाठी आम्ही लवकरच लढा उभारुन ह्या स्पेशल चाईल्डला प्रेमाचा व करूणेचा आधार देवू असे मत व्यक्त केले. अध्यक्षस्थानी असलेल्या सौ. वंदनाताई वासनिक यांनीही संस्था चालकांचे कौतुक करत आपल्या मनोगतात पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या आद. प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या सोबत चर्चा करून शासकीय योजना व सुविधा या मतीमंद मुलांना व त्यांच्या पालकांना सोबतच समाजात या मतीमंद मुलांना मनमोकळेपणाने वावरता आले पाहिजे यासाठी प्रयत्न करू असे मत व्यक्त केले. या रंगोत्सव कार्यक्रमात विविध रंगाच्या पुष्पपाकळ्यांचा रंग म्हणून वापर करण्यात आला. उपस्थित सर्वांनी हा रंगोत्सव मतीमंद मुलांच्या सोबत मोठ्या उत्साहात साजरा केला. जि. प. अध्यक्ष सौ. प्रतिभाताई भोजने यांनी मंतीमंद मुलांना फळ व उल्पोहार दिला त्याचप्रमाणे महानगर अध्यक्ष तथा जि. सदस्य शंकरराव इंगळे व सह जिल्हा प्रसिध्दी प्रमुख विकास सदांशिव यांनी संस्थेला एक वर्ष लागणारे अन्नधान्य देण्याचे जाहीर केले. या कार्यक्रमाला बहुसंख्य पालक व पदाधिकारी उपस्थित होते.


