माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डी. जी बनसोडे यांच्या शुभ हस्ते संपन्न
सोनेराव गायकवाड
तालुका प्रतिनिधी लातूर
लातूर : महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त, लातूर तालुक्यातील गंगापूर ते चिंचोली जुना पाणंद रस्त्याचे भूमिपूजन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डी. जी बनसोडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले आहे. या वेळी माजी ( जिल्हा परिषद सदस्य ) डॉ. सतीश कानडे, ( माजी सरपंच ) जनार्धन फुटाणे, ग्रामपंचायत सदस्य गुणवंत वाघे, ( माजी उपसरपंच ) तानाजी फुटाणे, भास्कर पाटील, बच्चेसाहेब शिंदे, हनुमंतअप्पा शिंदे, रावसाहेब फुटाणे, किरण शिंदे, अंकुश शिंदे, बब्रुवान बनसोडे, संजय गायकवाड, चाँद शेख, मेनोदीन शेख याच्या सह गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.