किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर : शिर्ला (अंधारे) अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर तथा सद्गुरु प.पू. मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल अॅण्ड मेडिकल ट्रस्ट च्या वतीने झालेल्या नि:शुल्क आरोग्य तपासणी शिबीरला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला विरंगुळा केंद्रात प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलना नंतर श्री सोमपुरी महाराज ज्येष्ठ नागरिक संघाचे वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. रामायणाचार्य महादेव महाराज निमकंडे यांनी प्रास्ताविकात आरोग्य सेवेच्या उपक्रमा बाबत श्री स्वामी समर्थ परिवाराच्या कार्याचे कौतुक केले. डॉ सौ पाटील कराड यांनी श्री स्वामी समर्थ परिवाराच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.प्रा.टी.जी मिरगे यांनी आपल्या मनोगतामध्ये ‘देही आरोग्य नांदते भाग्य नाही या परते’ या संत वचनाचा दाखला देऊन आरोग्य तपासणी नियमित करण्याचे आवाहन केले. डॉ पाटील, डॉ पार्थ, डॉ सौ पाटील यांनी नाडी परिक्षाणाद्वारे रुग्णांची तपासणी करून आजाराचे अचूक निदान करून रुग्णांना उत्पादन मूल्या एवढ्या अल्प दरात औषधें सुद्धा उपलब्ध करून दिली सदर शिबिरात ८१ पुरुष व ७१ महिला महिला अशा १५२ रुग्णांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला . यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त होती. श्री स्वामी समर्थ केंद्र बाळापूर, पातूर, शिर्ला आणि श्री सोमपुरी महाराज ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्यांनी रुग्ण तपासणीचे कामात आणि औषधे वितरणात मोलाचे सहकार्य केले. श्री स्वामी समर्थ परिवाराचे अजिंक्य पाटील, सुरेश मोडक, शर्मा,विजय अंधारे, चंद्रकांत अंधारे, रूपाली अंधारे, उमा अंधारे, आशा ताई अंधारे, कल्पना अंधारे, सुजाता अंधारे, भक्ती पातुरे, आचल पातुरे, तनुजा अंधारे, नेहा गवळी तर सोमपुरी महाराज ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नारायण अंधारे, वीर पिता काशीराम निमकंडे, निळकंठराव अंधारे, दामोदर अंधारे, सुहास कोकाटे, ह.भ.प राजू महाराज कोकाटे, श्रीकृष्ण रा. अंधारे, रामकृष्ण खंडारे, सुरेंद्र गाडगे, उकर्डा ढाळे, डी एस इंगळे, मेजर इंगळे, ज्ञानदेव हिरळकर, देविदास अंधारे, गजानन अंधारे, अनंत अंधारे, आणि ग्रामस्थांची उपस्थिती होती.