महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : जि.प.सदस्या अर्चनाताई जिवतोडे यांच्या पुढाकाराने भद्रावती तालुक्यातील विविध गावांमध्ये विविध विकासकामांचे भूमीपूजन जि. प. सदस्या अर्चनाताई जिवतोडे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.दि.२० मार्च रोजी जिल्हा परिषद निधी अंतर्गत पिर्ली येथे स्मशान भूमिला प्रिकॉस्ट प्लेट चे बांधकाम, धामणी येथे रोड काॅंक्रीटिकरण , बेलगांव येथे शिवशंकर मंदिराला प्रिकॉस्ट वालकंपाऊंड बांधकाम, मासळ येथे पाण्याच्या टाकीला प्रिकॉस्ट वालकंपाऊंड बांधकाम इत्यादी विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी बेलगांवच्या सरपंच भारतीताई आगलावे, वाघेडाच्या सरपंच पौर्णिमा ढोक, मासळचे सरपंच प्रमोदभाऊ मुंडरे, डोंगरगावच्या सरपंच मनीषा तुराणकर, प्रफुलभाऊ वाभिटकर, जवेंद्र मगरे, प्रफुल टोंगे, मुकेश आस्कर, विजूभाऊ तराळे, नामदेव तराळे, वर्षा नन्नावरे, चंद्रकांत जिवतोडे, सुरेश तराळे, ग्रामसेवक व ग्रामवासी उपस्थित होते.


