मनिवाइज वित्तीय साक्षरता केंद्र चा उपक्रम
किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातूर : दि : 15/3/2022 भारतीय रिझर्व बँक,बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या माध्यमातून क्रिसील फाउंडेशन च्या सहकार्य नी मनिवाईज वित्तीय साक्षरता केंद्र पातूर अंतर्गत ग्राम गोंधळ वाडी येथे वित्तीय साक्षरता प्रकल्पास सुरुवात करण्यात आली आहे. मनिवाइज केंद्र च्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये दीर्घकालीन आर्थिक जागरूकता आणणे आणि समुदाय पातळीवर सहभागात्मक व आत्मनिर्भर दृष्टिकोनातून मार्फत सकारात्मक आर्थिक शोध वर्तन निर्माण करणे या उद्देश पूर्ती साठी केंद्र कार्यरत आहे याच अनुषंगाने ग्राम गोंधळ वाडी येथे वित्तीय साक्षरता कार्यशाळा घेण्यात आली .यावेळी उपस्थिताना बचत गुंतवणूक , विमा ,पेंशन ,कर्ज ,गो डिजिटल आदी बँकिंग सेवा सुविधा विषयी माहिती देण्यात आली.यावेळी मनिवाइज केंद्र चे केंद्र व्यवस्थापक किशोर चक्रनारायण यांनी वित्तीय साक्षरता काळाची गरज ,बँका च्या मूलभूत सेवा,या विषयी प्रामुख्याने मार्गदर्शन केले.यावेळी क्षेत्र समन्वयक सय्यद मुशर्रफ गावचे सरपंच सुभाष बंडोजी खिल्लारे ,पोलीस पाटील वामन आनंदा भोकरे,व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.