सोनेराव गायकवाड
प्रतिनिधी लातूर
लातूर : लातूर येथे सार्थ अकॅडमीच्या पाच व्या वर्धापन दिनानिमित्त छत्रपती संभाजी महाराज आदर्श समाज सेवा पुरस्कार राजमाता बहुउद्देशीय सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष बालाजी जाधव यांना सन्मानचिन्ह व पदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे.व सार्थ अकॅडमीचे सोपान चव्हाण यांना आदर्श शिक्षक म्हणून सन्मानचिन्ह व पदक देऊन सन्मानित करण्यात आले.या वेळी सार्थ अकॅडमी मधील प्रथम, द्वितीय विध्यार्थ्यांना पण सन्माचिन्ह व पदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अशोक सोनवने तर प्रमुख पाहुणे म्हणून ऍड. गणेश गोमचाळे (नगर सेवक लातूर ) उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या शेवटी सार्थ अकॅडमीचे संस्था चालक देवमाने सर यांनी पुरस्कार प्राप्त ,मान्यवर व उपस्थितांचे आभार मानले आहे. या वेळी चंद्रकांत खटके, कालिदास खोबरे, अनिल चिकटे, दिलीप चिकटे, ईश्वर बुलबुले, प्रतिन पोटभरे, ज्ञानेश्वर चिकटे, बाबासाहेब सोनवणे, सोहम इगवे ईत्यादी विध्यार्थी व पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


