किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
अकोला : सचिन डान्स स्टुडिओ तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त मूर्तिजापूर शहरात तीन दिवसीय मोफत झुंबा फिटनेस आणि योगा कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सहा मार्च ते आठ मार्च दरम्यान घेण्यात आलेल्या या कार्यशाळेत सुमारे १०० महिला सहभागी झाल्या होत्या, यामध्ये शहरातील सर्व वयोगटातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.या कार्यशाळेचा समारोप मंगळवारी स्थानिक शिव शिवाजी महाराज उद्यान गोयंका नगर येथे झाला. समारोपीय कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून मूर्तिजापूर नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्ष मोनाली गावंडे तर प्रमुख उपस्थिती म्हणून , प्रा.अमिता तिडके, माजी नगरसेविका स्नेहा नाकट, सरिता पाटील, विष्णू लोडम, हर्षदा डोंगरे उपस्थित होत्या. दररोजच्या आयुष्यात महिलांनी आरोग्य आणि फिटनेस बद्दल जागरूक असावं असा सूर कार्यक्रमातून उमटला.यावेळी गायत्री मुळे, लता वाकोडे, प्रज्ञा वर्घट, रश्मी टावरी, कोमल साळुंखे, प्रतिक्षा साळुंखे, रंजना डोंगरदिवे, हेमा हरजानी, सोनिका हरजानी, यशस्वी निरभावने,पुजा बुरघाटे, कविताई साखरे, डांबरेताई, राजश्री सराळे सह अनेक महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमासाठी सचिन डान्स स्टुडिओ चे संचालक सचिन वाकोडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता डाबेराव तर आभार शुभांगी डाबेराव यांनी मानले.