किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर : स्थानिक डॅा एच एन सिन्हा कला व वाणिज्य महाविद्यालयात जागतीक महिला दिन व गौरव सोहळ्याचे आयोजन प्रभारी प्राचार्य डॅा किरण खंडारे यांच्या अध्यक्षतेखालील व मार्गदर्शनात साजरा करण्यात आला.या प्रसंगी विचारपीठावर प्रमुख अतिथी तथा उद्घाटक म्हनुन उपाध्यक्ष जि. प. सावित्रीताई हिरासींग राठोड, शिर्ला उप-सरपंच सौ कल्पनाताई खरडे,शिर्ला ग्रामपंचायत सदस्य सौ किरणताई येनकर, प्रमुख उपस्थिती म्हनुन डॅा सुनंदाताई रेवसे, डॅा लताताई थोरात, प्रा अर्चनाताई बेलसरे, प्रा पुष्पाताई भोयर, प्रा विद्याताई उमाळे, प्रा सारिकताई मोहोड, डॅा अस्मीताताई बढे, डॅा विनायक वसु, प्रा अतुल विखे, प्रा हर्षल एकबोटे, प्रा हिरेकर उपस्थीत होते.सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमांचे पूजन व हारार्पन करण्यात आले.त्यानंतर संगीत विभागाचे प्रा मंगेश राऊत आणि महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी जमीर यांनी स्वागत गीत सादर केले.त्यानंतर महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यांच्या हस्ते आपापल्या क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल शाल, श्रीफळ आणि पुष्पगु्च्छ देवुन कर्तुत्ववान महिलांचा महिला दिनानिमित्त सत्कार करण्यात आला. यामध्ये अनुक्रमे डॅा सुनंदा रेवसे, डॅा लता थोरात, प्रा अर्चना बेलसरे, प्रा पुष्पा भोयर, प्रा विद्या उमाळे, प्रा सारिका मोहोड, डॅा अस्मीता बढे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा विजया साखरे यांनी केले प्रास्ताविकात त्यांनी महिला दिनाचे महत्व आणि कर्तुत्ववान महिलांचा सत्कार याबाबत विवेचन केले.त्यानंतर उद्घाटक म्हनुन उपाध्यक्ष जि प. सावित्रीताई हिरासींग राठोड यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन झाले असे जाहीर केले आणि सर्वांना जागतीक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.प्रमुख अतिथी म्हनुन बोलतांना डॅा सुनंदा रेवसे यांनी सांगीतले की, प्रत्येक महान व्यक्तींच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा सिंहाचा वाटा असतो. शिवरायांच्या स्वराज्य स्थापन करण्या मागील प्रेरणा असणाऱ्या माता जिजाऊ, स्वातंत्र्याची चेतना देणाऱ्या राणी लक्ष्मीबाई आणि स्त्री शिक्षणा साठी झटणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या सर्व स्त्रियांच्या कार्यातुन आजच्या विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यायला हवी. १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ ८ मार्च हा ‘जागतिक महिला दिन’ म्हणून स्विकारावा असा ठराव क्लारा झेटकिन यांनी मांडला, तो पास झाला आणि तेव्हापासून ८ मार्च यादिवशी जागतिक महिला दिन साजरा करण्यात येऊ लागला असे सांगुन विविध ऐतिहासीक उदाहरणे देवुन त्यांनी स्री सक्षमीकरणावर भर दिला. त्यानंतर डॅा लताताई थोरात यांनी सांगीतले की, आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे सर्वात मोठे उद्दिष्ट म्हणजे महिला आणि पुरुषांमध्ये समानता निर्माण करण्यासाठी जागरूकता आणणे, तसेच महिलांना त्यांच्या हक्कांविषयी जागरूक करणे होय. आपल्या अनुभवविश्वातुन अनेक उदाहरणांच्या साहाय्याने त्यांनी महिलांच्या सुरक्षेविषयी व प्रगतीविषयी माहीती दिली. त्यानंतर प्रा विद्याताई उमाळे यांनी महीलांना आदराने व सन्मानाने आपले जीवन जगायला हवे असे विचार मांडुन शुभेच्छा दिल्या.अध्यक्षीय भाषनात प्रभारी प्राचार्य डॅा किरण खंडारे यांनी सांगितले की, 8 मार्च हा दिवस महिलांच्या कर्तृत्वाचा उत्सव साजरा करण्यासाठी समर्पित आहे. महिलांचे हक्क आणि लिंग समानता याबद्दल जागरुकता वाढवणे हा या दिवसाचा उद्देश आहे.म्हनुन आपण आज कर्तुत्ववान महिलांचा सत्कार केला. शांतता, न्याय, समानता आणि विकासासाठी केलेल्या संघर्षाची आठवण ठेवण्यासाठी देशभरातील महिला विविध सांस्कृतिक आणि वंशीय समूहांच्या सर्व सीमा पार करतात. आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणजे स्वत: ची किंमत जाणवणे आणि संभाव्यतेनुसार उद्दीष्टे साध्य करणे. त्याशिवाय, जीवनातील सर्व अडथळे पार करण्यासाठी चे धैर्य स्त्रियांनी ठेवले पाहिजे. असे प्रतिपादन केले.कार्यक्रमाचे संचालन सांस्कृतीक समन्वयक डॅा दिपाली घोगरे यांनी तर आभारप्रदर्शन प्रा नम्रता मोहोड यांनी केले.कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.











