अभिजीत फंडाट प्रतिनिधी मोरगाव भाकरे
दि. 26-06-2021 प्राथमिक आरोग्य केंद्र आगर अंतर्गत उपकेंद्र मोरगाव भाकरे येथे तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.जगदिश बन्सोडे व वैद्यकीय अधिकारी डाॅ.अजयकुमार नाथक यांच्या मार्गदर्शनाखाली कोवीड-19 लसिकरण शिबीर घेण्यात आले. त्यामध्ये 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांना प्रथमच कोविशिल्ड लस देण्यात आली. सर्व प्रथम येथील ग्रा.पं.सरपंचा उमाताई माळी यांनी लस घेतली.गावातील लोकांनी लसीकरणास उस्फुर्त प्रतिसाद दिला.110 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.लसिकरण शिबीर यशस्वी होण्यासाठी डाॅ.जयमाला घाटे,बि.एस.वाकोडे, किरण गायकवाड,जी.एम.नागे,शितल कुकडे,रंजना भाकरे,पद्ममिनी खडसे,सोनु कोरे,मालु जंजाळ यांनी अतोनात प्रयत्न केले.तसेच अभिजित फंडाट,सतिश जंजाळ,वंदना कथले,अरुणा आगरकर यांनी सहकार्य केले.