गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा तालुक्यातील पाथर्डी शेत शिवारातील विद्युत पोलवर काम करतांना दि.२०जुन रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास विद्युत शाॅक लागुन पोलवरच मरण पावलेल्या इसमाच्या मृत्यू प्रकरणी दि.२५जुन रोजी रात्री उशिरा मृतक नितिन ईसमोरे यांच्या लहान भाऊ गुरुदेव ईसमोरे यांच्या तक्रारीवरून तेल्हारा पोलीसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे फिर्यादी गुरुदेव दत्तात्रय ईसमोरे रा.पाथर्डी ता. तेल्हारा यांनी तेल्हारा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली की त्यांचा लहान भाऊ मृतक नितिन दत्तात्रय ईसमोरे हा आमचे गावातील लाईनमन राजकुमार कासदे यांचे हाताखाली झिरो लाईनमन म्हणून त्यांचे सांगण्यानुसार इलेक्ट्रीक चे काम करीत होता त्याचे अकोट एम एस ईबी मध्ये बाह्य सहाय्यक टेक्नीशियन म्हणून सन 2018=19मध्ये काम केले त्याला 2020मध्ये कामावरून काढून टाकले होते तेव्हापासून फिर्यादी चा लहान भाऊ मृतक नितिन ईसमोरे हा वायरमन कासदे यांच्या हाताखाली काम करित होता घटनेच्या दिवशी 20जुन रोजी सकाळी दहा वाजता चे सुमारास फिर्यादी गुरुदेव दत्तात्रय ईसमोरे यांचा भाऊ नितीन ईसमोरे यास वायरमन कासदे यांचा फोन आला की गोवर्धन वाघ रा.पाथर्डी व दिलीप कुकडे या.राणेगाव यांच्या शेतातील लाईनचा फॉल्ट काढुन दे ही बाब मृतक नितिन ने आईच्या कानावर घातली होती त्यानंतर काही वेळातच गोवर्धन वाघ व दिलीप कुकडे हे फिर्यादी गुरुदेव दत्तात्रय ईसमोरे यांचा भावास घ्यायला आले मृतक नितिन ईसमोरे याने गावाजवळील विद्युत रोहीत्रावरु विज पुरवठा बंद केला व किसन यशवंत टेकाडे यांच्या शेतातील विद्युत पोलवर फाॅल्ट काढण्यासाठी पोलवर चढला पोलवर इलेक्ट्रीक काम करीत असतांना दुपारी एक वाजताच्या सुमारास इलेक्ट्रीक शॉक लागून पोलवरच त्याचा मृत्यू झाला .त्याचे मृत्युस अकोट दक्षिण खेडेवितरण केंद्र तंत्रज्ञ वायरमन राजकुमार कासदे, गोवर्धन वाघ,आणी दिलीप कुकडे,हे जबाबदार आहेत असा आरोप फिर्यादी गुरुदेव दत्तात्रय ईसमोरे यांनी तक्रारीत केला आहे सदर तक्रारी वरुन दि.25जुन रोजी रात्री उशिरा तेल्हारा पोलीसांनी नमुद आरोपी विरूध्द भांदविच्या 304अ, 34 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश कायंदे हे. कॉ.जगदिश पुंडकर पोलिस कॉन्स्टेबल सतिष भटकर या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत