सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी
मेहकर तालुका राष्ट्रीय मानव सुरक्षा सेवा संघ व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रफिक कुरेशी होते तर प्रमुख अतिथी म्हणून तालुकाध्यक्ष प्रवीण पऱ्हाड ,राजश्री पाटील, मुन्ना काळे, फिरोज शाह, प्रकाश सुखदाने, उमेश शीलवंत, विलास लंबे ,गजानन लादे, रवींद्र मानघाले, शारदा डोंगरदिवे ,आकाश अवसरमोल,विजय वायाळ आदी प्रामुख्याने उपस्थित होते सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले
यावेळी तालुकाधक्ष प्रविण पऱ्हाड यांनी प्रास्ताविकात छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला यावेळी रफिक कुरेशी, मुन्ना काळे ,राजश्री पाटील ,शारदा डोंगरदिवे आदींनी विचार व्यक्त केले
यावेळी मेहकर तालुका महिला आघाडी अध्यक्षपदी शारदा डोंगरदिवे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला नंतर तालुका कार्यकारणी संदर्भात चर्चा करण्यात आली
कार्यक्रमाचे संचालन फिरोज शाह यांनी तर आभार प्रकाश सुखदाने यांनी केले यावेळी राष्ट्रीय मानव सुरक्षा सेवा संघाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.