वृषभ दरोडे
तालुका प्रतिनिधी राळेगाव
देशभरात कोरोना विषाणू चा प्रभाव कमी होत असताना अचानक कोरोनाच्या नवीन डेल्टा प्लस नावाच्या विषाणू चा प्रसार होत असल्याचे निदर्शनास येताच निर्बंध लागू करण्याचे आदेश देण्यात आले.त्यानुसार यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आदेश काढत निर्बंध लागू केले आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने दररोज सकाळी 7 ते सायंकाळी4 वाजेपर्यंत सुरू राहतील.अत्यावश्यक मध्ये शेतीविषयक अवजारे, शेतीविषयक औषधी यांचा समावेश होतो.तसेच बिगर अत्यावश्यक म्हणजेच हार्डवेअर ,वेल्डिंग, इलेक्ट्रॉनिक व इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार पर्यंत सकाळी 7 ते सायंकाळी4 वाजेपर्यंत सुरू राहतील.शनिवार व रविवारी बिगर अत्यावश्यक वस्तूंचे दुकाने पूर्णपणे बंद राहतील. तसेच सार्वजनिक स्थळे,मैदाने सकाळी 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत च सुरू राहतील.लगन समारंभात 50 जणांच्या उपस्थितीत करण्याचे आदेश आहेत .लग्नसमारंभ साठी पर्व परवानगी घ्यावी लागणारच.अंत्यसंस्कार साठी 20 लोकांची परवानगी देण्यात आली आहे.वरील सर्व निर्बंध 28 जुन 2021 रोजी लागू होतील तसेच पुढील आदेश येई पावेतो लागू असतील